
कलंकी देव संदेश – कलंकी देव वाढदिवस
गुरुवार दि. २५-०७-२०१९
गुरुवार दि. ०१-०८-२०१९
।। श्री गणेशाय नमः ।। श्री गुरु ब्रम्हाय नमः ।।
।। वैजनाथ रामकृष्ण ।। ॐ सोहं परब्रह्मय नमः ।।
सद्गुरू कलंकी देव म्हणतात, अरे मानवा मी स्त्री नाही आणि पुरुष ही नाही. मी पुरषोत्तम असा पूर्ण सिद्ध आत्मा आहे व होतो आणि नित्य राहणार आहे. माझा जन्म नाही. मी अजन्मा असुन जन्म भास घेतला होता आणि घेतला आहे. हा मानव भास मी मानवा साठीच घेतला आहे. त्याशिवाय हे ब्रह्मसूत्राचे कार्य कसे होणार. आणि माझ्या साधु संत विभुती सती पतिव्रता यांना मी कसा कळणार. यासाठी मी मानवात आलो आणि मानव झालो व मानवतेची खरी सत शिकवण मानवाला दिली. खऱ्या सत मानव धर्माचे मला रक्षण करावयाचे असुन, मानवाला जागृती द्यावयाची आहे. माझ्या मी चा पत्ता कुण्या मानवाच्या हाती नाही. खरा मी शोधून ही घावत नाही. तो मी सत संताला लाभतो व जाणता जाणिवेत येतो तेव्हाच दिव्य ज्ञान प्रकाश प्रकाशित होतो.
अरे सद्भक्ता, ज्ञान दिप हाच खरा शुद्ध आणि नाशी प्रकाश देणारा ज्ञान दिप आहे. म्हणून मी शुद्ध आत्माच आहे. माझी जाणीव कर. मी जरी या साध्वीत बोलत असलो तरी हा माझा शक्तीचा अंश आत्माच आहे. अरे माझे मी मंदिर शोधुन बोलतो आहे. मी गेलो हा भास मानवाला दिला. मी गेलो नाही आणि आलो नाही. आहे तोच होतो, आहे आणि राहणार आहे. माझा लोप होणार नाही. वेळेप्रमाणे माझे प्रगटीकरण होणार आहे. तेव्हा भक्ता तू माझी चिंता करू नकोस. तुझे तू सत कर्तव्यात राहा आणि सत कार्याची दक्षता घेत आहे असा दृढ विश्वास ठेव. मी दत्तच आहे. तो मी कलंकी स्वयंम सिद्ध आहे व होतो आणि राहणार आहे.
अरे सद्भक्ता, माझी मुळ कर्ता करविती आदिशक्ती शक्ती मुळमाया कार्यरत असते आहे व पुढेही राहणार आहे. माझे ब्रह्म तत्व मुळ स्वयंभू आहे. ते कुणी घडवले नाही. ते महा कुंडिलिनीतुन प्रणव रुपाने जागे आहे व होते आणि पुढेही राहणार आहे. मुळ प्रणव सीमेत ओंकाराचे पूर्ण अधिष्ठाण आहे होते व राहणार आहे. या कलियुगाच्या महाप्रलयापर्यंत मी अधिष्ठानाने या भारतातच आहे. मी मरणारा आत्मा नाही. व अनेकांना माझ्यात समरशी घेणार आहे. यासाठी खरा सत पात्रादार हवा. सत पात्रते शिवाय स्वयंभु तत्वज्ञान कळणार नाही. कारण शेणात साखर टाकली तर ती पुन्हा काही कामी पडत नसते. यार गबाळ्याचे काम नसते. याला खरा हिराच हवा. तेव्हा तो आम्ही घासुन त्याला या जगापुढे स्पष्ट करतो. कारण दिपाने दिप प्रज्वलित होतात. परंतु त्या सत्पात्री येण्या हवा. माया मोह स्वार्थ सुटण्या हवा. सत नीती धर्म पाळणारा हवा. माझा मिचा सुटण्या हवा. अहंकार तर खरा शत्रू आहे. याला मागे सारले पाहिजे. सत नीती आणि धर्म शुद्ध हवा. तसेच देही शुद्ध होण्या हवी. आप स्वार्थ नको. दया माया क्षमा शांतीचे आगार खुलण्या हवे व हवे असते.
अरे सद्भक्ता, माझा मिची देहबुद्धी सरल्या वाचून खरा मी कोण कळणार नाही. मी सत्य आहे. मी स्मरणातीत तरीही सद्भक्तासाठी स्मरणात आलो. मी निरभान निरामय असा निश्चल आहे आणि वीराळ आहे. माझ्या जाणत्याची जाणीव ज्याला होईल तोच पुढे संत भुमिकेत येईल. कारण मला कर्त्याला कर्तेपणात आणणारी माझी मुळ माया आहे. मी परब्रह्म निच्चल आहे व ठायीच स्थिर आहे. परंतु एवढा खटाटोप करणारी माझी शक्ती आहे. मी जन्माला आलो नाही आणि मेलोही नाही. जन्माला माया आली आणि तिनेच हा कलंकी अवतार धरला. हिच कलंकाई मुळ आदिशक्ती न दिसनारी व प्रेरणा देणारी मुळ माया होय. हिचाही जन्म झाला नाही. हि स्वयं स्वयंभू तत्वाने भानात आली व प्रणव रुप धारा नटली. हिचा थांगपत्ता लागणार नाही व तो मी लावेल असे कुणी म्हणू नाही. कारण ती जगतची जगत माता मुळ ईश्वर कडाडणारी बिजली आहे. अग्नि ज्वाळा आहे. हिला शांत ठेवणारे सद्गुरू ब्रह्मवेत्ते दत्त आहे व होते व पुढेही राहणार आहे.
तरी कृपया कार्यातच रहा. घाबरु नका. मी पाठीशी आहे व होतो आणि राहणार आहे. बरे असो, या जागतिक घडामोडी चालु राहणार व सत्याचा छळ करणाऱ्याला शिक्षा होणार. इतराला नाही. परंतु आसुर वृत्ती घायाळ करणार व सत्याचा विजय होणार. सत्याचा ध्वज फडकणार व याची चिंता करु नये. तरी लोभ असावा हि नम्र विनंती.
तरी चुकल्यास क्षमा करावी. चुकले ते माझे आणि बरोबर ते देवाचे. बरे असो.
आपली गुरु भगिनी,
बेबीमाया
कलंकी देव संदेश संपुर्णम
