कलंकी देव भक्त दगाबाई कदम (दगा अक्का-माताजी भगिनी), वडगाव लांडगा यांचे अनुभव:
अध्यात्म हा अनुभव खूप महत्त्वाचा असतो. तो अनुभव आपल्याला शुद्ध भक्ती आणि शुद्ध प्रेम यामुळे येतो. माताजींचे मला लहानपणापासून खूप अनुभव येतात. माझं बालपण त्यांच्या सहवासात गेले. लौकिक दृष्ट्या पाहिलं तर माताजी व माझं नातं बहिणी-बहिणीचे. पण मी त्यांना देवीच्या (गुरूच्या) रूपात नेहमी पहाते. त्या रूपात मला माताजींचे दृष्टांत होतात. मी पाच-सहा वर्षांची असताना जवळे कडलग येथे आमच्या घराच्या अंगणात झोपलेली असताना माताजींचा स्पर्श होताच, मला त्यावेळी पहिल्यांदा शरीरात विषय वार जाणवला. तिथून माझ्या अनुभवाला सुरुवात झाली. मला लहानपणी माताजी शिवाय करमत नव्हते. आम्ही दोघी नेहमी बरोबर असायचो. दुकानात काही आणायला गेल्यावर त्या माझ्या खोड्या करायच्या. भगवान श्रीकृष्ण लहानपणी जसे गोपिकांच्या खोड्या करायचा तसेच माताजी ही खूप खोडकर होत्या.
माताजींच्या लग्नानंतर मी बरेच दिवस त्यांच्याबरोबर राहिले. मी सातवी पर्यंत शिक्षण पूर्ण केल. मी सहावीला असतानाचा प्रसंग मला सांगावासा वाटतो. माताजी जेव्हा धांदरफळ होऊन वडगाव लांडगा येथे यायला निघाल्या तेव्हा मला वाऱ्यातून भास व्हायचा माताजी येणार आहेत. जणू काही वारा मला सांगायचा की माताजी येणार आहेत. मी आईला सांगायचे की माताजी येणार आहेत त्यानंतर थोड्याच वेळात माताजी यायच्या. माताजी मिरवली बाबाची सेवा करायच्या. लग्नानंतर त्यांनी १४ वर्ष नगरच्या पहाडावर काढली. मी दररोज संध्याकाळी मीरावली बाबाच्या नावाने अगरबत्ती लावायचे आणि माताजींना चांगला होऊ दे अशी प्रार्थना करायची. माताजी पहाडावर असताना मला त्यांचं खूप टेन्शन यांयच. मी सारखा त्यांचाच विचार करत बसायचे. तेव्हा माताजी मला देवी पाण्यातून येताना, दिसत हातात त्रिशूळ घेऊन, नऊवार साडी घातलेल्या रूपात दिसायच्या. रोज देवापुढे दिवा अगरबत्ती लावल्यावर मला माताजी देवीच्या रूपात दिसायच्या. मला स्वतःमध्ये ही माताजी दिसायच्या. मग मी माताजींच्या सारखं राहणं, कुंकू लावन नऊवार साडी घालुन असं करायचे .
माझ्या लग्नाच्या वेळी माझे दोन्ही हात गळून गेलेले होते. डोळ्यातून सारखे पाणी येत होतं. कारण माझ्या लग्नात माताजी हजर नव्हत्या. त्यावेळी माताजी पहाडावर गेल्या होत्या. माझ्या लग्नानंतर माताजींच मुलं वारल होत. त्यांना वडगाव लांडगा येथे आणले. लग्न होऊन परत मुळाला मी माहेरी आले होते. लग्नानंतर माताजी सहाव्या दिवशी वडगाव लांडगा येथे आल्या. माताजी व माझी एक नजर झाली. आम्ही दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडलो. त्यावेळी मला पहिला शक्ती पात झाला. माताजींच्या शरीरातून माझ्या शरीरात काहीतरी आल्याचं जाणवलं. अंगाचा कापरा झाला त्यानंतर मला स्वतःचे भान राहिले नाही. त्यानंतर माताजींचा स्पर्श झाला तरी शरीरात काहीतरी होत असल्याची जाणीव व्हायची, हातापायाला मुंग्या यायच्या, प्रकाश एकदम शरीरात गेल्यासारखा वाटायचा. माताजी जागृती अवस्थेत असताना मुंबईला शिवाजी वाकचौरे यांच्या घरी आल्या होत्या. भक्त त्यांच्याकडे यायला सुरूवात झाली. तेव्हा शिवाजी वाकचौरे यांना शक्तिपात झाला. त्यानंतर पंधरा दिवस मी शुद्धीवर नव्हते. मला लहरी यायच्या मग माताजींनी मला मिठी मारून डोक्यावर हात ठेवला व मी शांत झाले. शिवरात्रीच्या दिवशी पहाटे चार वाजता स्वप्न पडलं. वडगाव लांडगा येथील गावातल्या मंदिरात माताजींनी माझ्या डोक्यावर हात ठेवला, कानात फुंकर मारून मंत्र दिला. पण हे सत्य म्हणाव तर ते मला दिसलं नाही आणि खोटे म्हणावं तर त्याची जाणीव तर झाली होती, मग त्या दिवशी संध्याकाळी माताजींनी सांगितलं की तो अनुग्रह होता. अध्यात्म हा अनुभव खूप महत्त्वाचा असतो. तो अनुभव आपल्याला शुद्ध भक्ती आणि शुद्ध प्रेम यामुळे येतो.
कलंकी देव भक्त सुनंदा खंडू वाकचौरे, वडगाव लांडगा यांचे अनुभव:
लहानपणापासून मला संतोषी मातेला भेटण्याची इच्छा होती. कोणतीही गोष्ट घडायला काहीतरी कारण निमित्त लागत तसेच माझी व माताजींची भेट गावात एक नलूबाई नावाच्या स्त्रीमुळे झाली. माताजीं कडे यायला नलूबाईला घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे त्या काहीतरी कारण काढून यायच्या, मला जाताना सांगायच्या की मी माताजीं कडे चाललेय पण घरी सांगू नको. पण त्यावेळी माताजीं कोण आहे? हेही मावशींना माहीत नव्हतं. मी व माझे कुटुंब १९८८-८९ च्या आसपास वडगाव लांडगा येथे राहायला आले. मळ्यात राहत असताना मी माताजींना पाहिल होत. गावातही मी त्यांना पाहिल होतं. ह्या कोणीतरी वेगळीच अद्भुत शक्ती आहे असं मला नेहमी वाटायचं. पण विचारणार कस आणि कुणाला? म्हणून मी शांत राहायचे. एकदा नलूबाई माताजीं कडे चालल्या असताना मी माझ्या पतींना विचारलं मी जाऊ का माताजीं कडे? तेव्हा त्यानी होकार दिला. तेव्हा प्रथमच मी माताजीं कडे गेले, तेव्हा मला त्या म्हणाल्या संतोषीमाता पहिल्या का? मला बऱ्याच वेळा असा अनुभव यायचा की अंतकरणातून पाहिलं तर संतोषीमाता मध्येच माताजी रूप दिसायच, दोन्ही रूप एकच दिसायची . तेव्हा मला त्या आवाजाची ओळख झाली की तो आवाज माताजींचा होता. त्या माझ्या बरोबर होत्या. त्यानंतर अधून-मधून मी मंदिरात माताजींच्या दर्शनाला यायचे. तिथे आल्यावर माझ्या मनाला खूप समाधान वाटायचं. माताजी मला म्हणायच्या येत जा दर्शनाला. त्यावेळी मलाही घरातून विरोध व्हायचा. मी काहीतरी कारण काढून दर्शनाला यायचे. येताना मध्ये चिंचेचे झाड होतं. तो चढ-उतार मला पर्वतासारखा वाटायचा कधी तो पर्वत पार करून माताजीं कडे जाते असं व्हायचं. त्यांना भेटण्याची मनात नेहमी ओढ असायची.
एकदा मी कीर्तनात ऐकलं की मानवी जीवनात गुरूचे व अनुग्रहाचे खूप महत्त्व असते. म्हणतात ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. त्यानंतर मला जीवनात गुरुजी उणीव जाणवू लागली. मी माताजीं कडे गेले असताना एकदा मी त्यांच्याकडे अनुग्रह मागितला, तेव्हा लगेच त्यांनी मला अनुग्रह दिला नाही. पण काही दिवसांनी त्यांनी मला अनुग्रह दिला. पण अनुग्रह देण्यापूर्वी त्यांनी मला काही प्रश्न विचारले. त्या मला म्हणाल्या तुझी खूप कसोटी होईल गावात लोक तुला नांवे ठेवतील तुला ते चालेल का? तू कसोटीला उतरतशील का? मी माताजींना म्हणाले मला कसोटीला उतरवणाऱ्या तुम्हीच आहात. माझ्या हातात काहीच नाही, सगळं देवा तुमच्या हातात आहे. एक दिवस सायंकाळच्या वेळी माझ्या पोटात कसंतरी वाटायला लागलं, संध्याकाळी आठ वाजता मी गावात मेडिकल मधून गोळी आणण्याचा निमित्त करून घरातून बाहेर पडले पण मी मेडिकलमध्ये न जाता माताजीं कडे मंदिरात गेले. तेव्हा माताजींना लहर आलेली होती, लहरीत त्या मला म्हणाल्या काही झालं तरी खुंटा सोडायचं नाही बरं का? त्यांची आज्ञा प्रमाण मानून मी आत्तापर्यंत माताजीं कडे येते व मला बरेच अनुभवही आले आहेत. माझ्या घरच्यांची स्वतःची वीटभट्टी होती. एकदा काही विटा काढण्यासाठी मी वर चढले, त्यावेळी विटा काढत असताना अचानक मी वरून खाली पडले. कशी पडले हे माझं मलाच कळलं नाही, इतक्यात संपत भाऊने मला हाक दिली. तेव्हा मी डोळे उघडले तर मला एका बाजूने देव व दुसऱ्या बाजूने माताजी दिसल्या. इतक्या उंचावरून पडूनही मला कुठेही काहीच लागलं नव्हतं. त्यानंतर मी दिवसभर काम केलं.
एके वर्षी नाशिकला सिंहस्थ कुंभमेळा होता. माझी बहीण नाशिकला राहते. माझ्या बहिणीने माताजींना तिकडे बोलावले होते. त्या अगोदरच दोन दिवसापासून माताजींच चाललं होतं की आपण त्रंबकेश्वरला जाऊया. माझ्या बहिणीचा फोन आला की चार वाजेपर्यंत सिडकोला या. त्यावेळी माताजींची लहर होती. मी त्यांना म्हटले त्या जायला लगेच तयार झाल्यावर, आम्ही नाशिकला गेलो. ध्वजा परभणीचा प्रसंग होता. त्यावेळी दंगल चालू होत्या. सर्व रिक्षा बंद होत्या. तरी एका रिक्षावाल्याने आम्हाला गंगेवर सोडलं. तिथं मला असा दृष्टांत झाला की दगा आक्कांनी(माताजींच्या भगिनी) मला बाजूला केलं व स्वतः अतिरेक्यांवर गोळ्या झाडल्या, दंगतील लोकांना सद्भक्तांना वाचण्यासाठी देव तिथे आले होते. त्यानंतर आम्ही सुरक्षित घरी आलो.
कलकत्त्याला रामकृष्ण परमहंस यांच्या आश्रमात एकदा भेट देण्याची माताजींचे इच्छा होती. डिसेंबर २०१२ मध्ये माताजी, मी व इतर कलंकी भक्त कलकत्त्याला गेलो होतो. तिथे जाण्यापूर्वी वडगाव लांडगा येथे आश्रमात असताना माताजी मला म्हणाल्या होत्या की एक-दोन डाळिंब बरोबर घ्या, तेव्हा मी त्यांना म्हटलं एक दोन डाळिंब एवढ्या सगळ्या माणसांना कसे काय पुरतील. मी डाळिंब घेतले नाही. माताजी आम्ही सर्वजण गंगेवर जात असताना, रस्त्यामध्ये खूप माकडे होती. त्यातील एका माकडाने माझी साडी ओढली मी खूप घाबरले. स्वतःला त्या माकडांपासून सोडवण्यासाठी मी त्याला केळे, बिस्कीट वगैरे देण्याचा प्रयत्न केला पण ते माकड काही घेईना. तिथे एका बाईने डाळिंबाचा छोटा तुकडा होता तो त्या माकडाला दिला, त्याने लगेच मला सोडून दिले. मला त्या क्षणी माताजींचे शब्द आठवले त्यांच्या शब्दात खूप मोठा अर्थ सामावलेला असतो, हे मला त्यावेळी कळले .
माझी इच्छा होती की माझ्या घरात नवरात्रात होम करावा. नवरात्रात अष्टमीच्या दिवशी माताजी व सर्व कलंकी भक्त यांनी स्वतःउपस्थित राहून माझ्या घरी होम केला. त्यानंतर संध्याकाळी सर्व कलंकी भक्तांना जेवणाचे आमंत्रण दिलं होतं. मला खूप टेन्शन आलं होतं. आपण कोणतीही गोष्ट मनापासून केली तर देव सहाय्य करतो. त्याप्रमाणे माताजींच्या कृपाशीर्वादाने होम व जेवणाचा कार्यक्रम व्यवस्थित व वेळेत पार पडला.
कलंकी देव भक्त कमल वाकचौरे, मुम्बई यांचे अनुभव:
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा: गुरु साक्षात परब्रम्ह परमेश्वरा: गुरु हा ब्रह्म, विष्णू आणि महेश आहे. खरंच मी खूप भाग्यवान आहे की मी श्री कलंकिनी बेबीनाथमाया (माताजी) यांच्या सगुण रूपात मला प्रत्यक्ष देव भेटले व त्यांच्या सेवा व कृपा आशीर्वादाचा लाभ आम्हा सर्व कलंकी भक्तांना मिळाला व अजूनही मिळतोय.
माझ्या जीवनातील एक विशेष असा प्रसंग तुम्हाला सांगते एकदा मी माताजींनी म्हणाले, की देवा तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माझ्या घरी या. तेव्हा लक्ष्मीपूजेच्या वेळी पुज्येच्या ताटात आम्हाला माताजींची पावले उमटलेले दिसले. लक्ष्मीपूजनाच्या वेळी आम्ही घराची सर्व दारे खिडक्या उघडी ठेवतो. त्या दिवशी आम्हाला आमच्या घरी माताजी सगुण साकार माता या रूपात दिसल्या.
मी माझी मुलगी व मुलगा यांना इंग्लिश मीडियम शाळेत घातले होते पण नंतर माझ्या मनात विचार आला की आपल्या घरी ग्रंथ वाचन करण्यासाठी एखादा तरी मुलगा मराठी माध्यमात शिकला पाहिजे. म्हणून देवा साठी मी माझा मुलगा जगदीश याला मुन्सिपाल्टीच्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकवले. जगदीश मोठा झाल्यावर त्याला चांगली नोकरी मिळाली व त्यांची पगार वाढ झाली. म्हणजेच देवासाठी कोणतीही गोष्ट मनापासून केली तर आपलं त्यात कल्याण होतं. फक्त आपल्याला विश्वासाचा पाया पक्का पाहिजे.
म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती. यावर आधारित माझ्या जीवनातील एक प्रसंग तुम्हाला सांगते. एक दिवस मला सत्संगासाठी दीपक दळवी यांच्या घरी जायचं होतं. पण त्या दिवशी सकाळीच एक पोपट आमच्या घराच्या खिडकीत येऊन बसला. मी त्याला एक पेरू दिला त्याने तो खाल्ला. नंतर तो आत येऊन देव्हाऱ्यावर बसला. एक-दीड तास तिथेच बसला मी पोपटाला खायला दिल. म्हणजेच माझा खूप वेळ पोपटाच्या नादात गेला. नंतर बराच वेळ झाल्यानंतर तो उडून गेला. मला भाईदरहुन दादरला ज्या ट्रेननि जायचे होते तिथे बॉम्बस्फोट झाला होता. पण त्या दिवशी उशीर झाल्यामुळे मी ट्रेननी न जाता बसने गेले. म्हणजे जणू देवाने पोपटाच्या रूपात येऊन माझी वेळ टाळली.
माताजींची व माझी पहिली भेट वडगाव लांडगा येथे माताजींच्या जुन्या घरी झाली, तेव्हा मी तेथे दोन-तीन दिवस राहिले होते. त्यावेळी माताजी नी मला खूप प्रेम दिलं आणि आतापर्यंत त्यांचं भरपूर प्रेम आम्हा सर्व भक्तांना मिळते. सुरुवातीला मी वडगावला खूप जायचे महिन्यातून चार चकरा व्हायच्या. तिथून घरी गेल्यावर मला अजिबात करमत नसायच. मी परत दोन दिवसांनी काहीतरी निमित्त काढून वडगावला माताजीं कडे परत जायचे. तेव्हा मी संगमनेर पर्यंत रातराणीने बसणी यायचे. त्यात बसल्यावर माझ्या शेजारी एक म्हातारी येऊन बसायची. ती देवाची गाणी म्हणायची मलाही संगमनेरला यायचं असं सांगायची पण जेव्हा संगमनेर स्टेशन वर उतरायचे तेव्हा ती उतरल्यावर पाहिलं तर म्हातारी कुठेच नसायची ती गायब झालेली असायची .
देव आपल्या भक्तांना संकटातून कसं वाचवतो याचं एक उदाहरण तुम्हाला सांगते. माझी मुलगी सुमती आठ वर्षाची असताना तिला गोवर निघाला होता. मी स्टोवर चहासाठी पाणी ठेवून दूध आणायला बाहेर गेले. सुमती घरात एकटीच होती मी बाहेर गेले आणि मागे घरात सगळा धूर झाला. देव तिथे आले त्यांनी सुमतीला बाहेर काढलं. आता तो स्टोचा भडका झाला होता. पण सुमती बाहेर होती तिला काहीही झालेलं नव्हतं.
प्रत्येक युगात माया व ब्रह्म अवतार येत असतात तसंच कलियुगात श्री पूर्ण परब्रह्म कलंकी अवतार ईश्वर वैजनाथ भगवान (देव) व श्री संत कलंकिनी बेबीनाथ माया (माताजी) या भूतलावर यांनी अवतार घेतला. कलंकी देवाचे महानिर्वाण झाले तेव्हा आम्हा सर्व कलंकी भक्तांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यानंतर देव व माताजींचे लिखाण पाहिले तर त्यात संदेश होता. मनातून आवाज दिला देव कुठेही गेले नाहीत, देव इथेच माताजींच्या रूपात आपल्या सर्वांबरोबर आहेत.
कलंकी देव भक्त द्वारका पोपट काळे, संगमनेर यांचे अनुभव:
देव भक्तांच नातं गुरू-शिष्याचं नातं. हे माय लेकाप्रमाणे शुद्ध निर्मळ असते. जसे आईचे गुण मुलांमध्ये उपजत असतात, तसेच भक्तावर देवाची कृपा झाल्यावर भक्त हे सदाचार नितीने सत्याचा मार्ग स्वीकारतो. देव आणि भक्त जेव्हा एकरूप होतात तेव्हा द्वइतभाव उपजत नाही. आतापर्यंत मलाही कलंकी देवांचे व माताजीचे भरपूर अनुभव आले. त्यांची कृपा माझ्यावर व माझ्या पूर्ण कुटुंबावर आहे. काही निवडक अनुभव तुमच्या पुढे सादर करत आहे.
नवरात्र, नवरात्रीची पहिली माळ, पाचवीमाळ, सातवी माळ, जोगवा कार्यक्रम यांचे सुरुवात आमच्या घरापासून झाली. काळे आजी म्हणजे माझ्या सासूबाई नेहमी म्हणायच्या माताजी (माई) आदिशक्ती पार्वती आहे. म्हणून आजी भगवंताची स्तुती करायच्या त्या म्हणायचा माई ह्या देवी आहे, आदिशक्ती आहे, त्यांची आरती निघालीच पाहिजे. मग माताजींनी “ ।।आरती बेबीमाया महासती महामाया । कृपावंत तव दृष्टी तारी भक्तीचिया पाया ।।” ही आरती व तुकारामाची आरती लिहिली.
मी लहान असताना मला भगवे कपडे घातलेला काळा, उंच, हातात त्रिशूळ असलेला संन्यासी दिसायचा. माझे माहेर श्रीगोंदा एक छोटासे खेडे होता. माझे नातेवाईक आणि सर्व तिकडच्या आसपासच्या भागातील होते. तिथे पुंडेवाहिरे गावात मोहम्मद माऊली म्हणून गुरु होते. त्यावेळी त्यांची खूप प्रसिद्धी झाली. माझ्या सर्व नातेवाईकांनी त्यांचा अनुग्रह घेतला होता. नंतर घरच्यांच्या आग्रहाखातर मलाही अनुग्रहा घ्यावा लागला. तिथे दररोज ध्यान करण्याच्या नियम होता. ध्यान करताना जे दृष्टांत पडले ते सर्वांना सांगायचे तेव्हा मला तीन दृष्टांत झाले.
१. आळंदी येथील ज्ञानेश्वर समाधी.
२. महाबळेश्वरचा डोंगर, नदीची स्थापना .
३. गुरूंची पुंडेवाहिरे येथील टेकडीवर असलेली समाधी.
ही ठिकाणे मला ध्यानात असताना दिसली. ही ठिकाणे यापूर्वी मी प्रत्यक्षात पाहिली नव्हती. लग्नानंतर मी कलंकी देवांच्या सान्निध्यात आले. कलंकी देवांनी मला अनुग्रह देण्याचा आग्रह केला. पण मी म्हटले मी मुहम्मद माऊलीचा अनुभव घेतला आहे. तेव्हा कलंकी देव मला म्हणाले की मुहम्मद माऊली हे तुझे मार्गदर्शक गुरु आहे. पण मी तुझा मोक्ष दाता गुरू आहे. माझी मोठी मुलगी ताई पोटात असताना मी कलंकी देवांकडून अनुग्रह घेतला. म्हणजे माझ्या मुलीला ताईला गर्भात असतानाच अनुग्रह मिळाला आणि त्यानंतर कलंकी देव ताईच्या प्रत्यक्ष प्रत्येक कार्यक्रमात सहभागी असायचे.
एक वर्ष सुरत मध्ये प्लेगची साथ आली होती. त्यात सुरत मध्ये खूप माणसे मेली संध्याकाळची वेळ होती. माताजी (माई) आमच्या घरी आल्या होत्या. रात्रीच्या जेवणाआधी आम्ही गप्पा मारत बसलेलो होतो. मी माताजींना म्हटलं सुरतला किती माणसे प्लेगमुळे मेली. माताजी तुम्ही भगवंताला विनंती करा. देव तुमचं ऐकतो ते आम्ही अनुभवलेला आहे. तुम्ही कोण आहात हे जरी आम्ही जाणू शकत नाही. पण तुम्ही मारलेली हाक ही भगवंताला ऐकू जाते. मग माईंनी विष्णूची स्तुती केली की भगवंता दया कर यांच्यावर. भगवंता तू प्लेगच्या साथीला आवर घाल. अशी त्यांना स्फूर्ती आली त्यानंतर आम्ही जेवलो व आमची दैनंदिन काम करू लागलो. सकाळी पेपरला बातमी आली की सुरत मधील प्लेग पूर्ण थांबला.
मी अगोदर शिवकाम करायचे दररोज १ डजण ब्लाउज शिवायचे शिवाय घरच काम वेळेत करायचे. घरात चार-पाच पोरं आजीचं सगळं नियमात करायचे. ब्लाऊजही शिवायचे. मलाच कळत नव्हतं की एवढी सगळी काम माझ्याकडून कशी व्हायची. एकदा माई आल्या. शिवलेल्या कपड्यांचे वलन पूर्ण भरलेली होती. माई म्हणायच्या मला पण काम दे? मी म्हणायचे मी कसे काम देईन तुम्हाला. तेव्हा वडगावचे बाबा शिवायचे.
मी ज्या बाईकडून शिवंन आणायचे ती बाई मला ५ रुपये प्रमाणे ब्लाउजचे पैसे द्यायचे. दिवसाला मी बारा ब्लाउज शिवायचे, दिवसाला मला ६० रुपये मिळायचे. असच एकदा आम्ही वडगावला गेलो होतो. माईनी आम्हाला थांबायचा खूप आग्रह केला. मी विचार केला की घरी गेले तर ६० रुपयांचं काम होईल, इथे थांबून काय करायचं असा विचार करून आम्ही निघालो, व वडगाव लांडगा फाट्यावर आलोच होतो तर गाडीची चैन तुटली. ती गाडी महादेव मंदिराजवळ ह्यांच्या (पोपट काळे) मित्राच्या घरी ठेवली. कस तरी आम्ही घरी पोहोचलो. दुसऱ्या दिवशी रोज काम आटपून मी दहा वाजेपर्यंत त्या शिवनकामवाल्या बाईकडे ब्लाउज शिवन आणायला गेले. त्या बाईने कधीतरी कलंकी देवांचे पुस्तक नेले होते. ते तिच्याकडे होते ती म्हणाली की पाच वर्षांपूर्वी माझ्याकडे हे पुस्तक आलंय, त्यात कलंकी देवाचा फोटो होता. त्यावेळेस स्कायलँड पडणार होत. तेव्हा बायांनी सोन वगैरे गिळल होते. सगळे लोक मारणार आहे, असं सगळीकडे झालं. त्या बाईकडे माझ्या शिवणकामाचे भरपूर पैसे होते. ती म्हणाली सकयलँड कधी पडेल हे मला माहीत नाही. पण मी जेव्हा यातून सुटेन तेव्हा पैसे देणार तोपर्यंत मी पैसे देणार नाही. तिने पुस्तक काढलं ती म्हटली माझ्याकडे नवीन दोन बाया शिवायला आल्यात, तेव्हा आजपासून तुझ काम बंद मग मी तशीच घरी आले.
माझ्या लहान भावाला ही कलंकी देवांचा अनुग्रह मिळाला. माझा भाऊ तिसरी किंवा चौथीला असताना त्याला देवांचा अनुग्रह मिळाला. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी तो भाऊ आजारी पडला. त्याच्या मेंदूत पाणी झालं, त्याचे एका वेळी ६ ऑपरेशन झाले. रक्ताचं थारोळं झालं होतं तरीही तो वाचला.
