कलंकी सद्गुरूची भेट

||पूर्ण परब्रह्मा कलंकी सद्गुरूंची भेट||

सन १९८३ बेबीमाई वडगाव लांडगे येथे त्यांना भक्त तहणूबाई लांडगे यांनी दिल्येल्या घरात उदास होऊन बसल्या होत्या.त्यांना काही करमत नव्हते तेव्हा तेथील भक्त श्री संपत यांना विचारले अरे संपा ! मला काही वाचायला तरी पुस्तक देरे? तेव्हा संपत कडे नुकतयेच संगमनेर येथील कलंकी देवाचे आत्मचरित्र पुस्तक आणले होते.ते वाचायला देताच त्या पुस्तकातील कलंकी वैजनाथ भगवानचा फोटो साक्षात त्यांच्याशी बोलू लागला व तुझी दत्तच मी येथे प्रकट आहे.मला भेटण्यास ये असे म्हणू लागला. कशीबशी त्यांनी रात्र उजाडली त्या दिवशी त्या यजमानांना घेऊन संगमनेर येथील नगर रोडला ज्ञानमाता शाळेसमोर असलेल्या कलंकी दहावा अवतार ईश्वर वैजनाथ भगवान यांच्या आश्रमी पोहोचल्या.त्यांची व कलंकी देवांची दृष्टांत होतास दोघांनाही एकमेकांना ओळखले कलांची देवांनी त्यांना जवळ बोलावून घेऊन त्यांच्या तोंडावरून व पाठीवरून हात फिरविला व लगेच त्यांना नमस्कार दिला.