कृष्ण पाठ

।। श्री कलंकी देव वैजनाथ कृत एकेश्वरी कृष्ण पाठ ।।

कृष्ण कृष्ण म्हणा कृष्ण म्हणा । गोकुळीचा जाणा धरा चोर ।
कोंड कोंडूनीया ठेवा हृदयात । बांधा भगवंत भक्ती प्रेमे ।
करा एकेश्वर हृदयी जागृत ।  सेवा ज्ञानामृत सत्संगाने ।
वैजनाथ म्हणे सत्संगे श्रीहरी । जवळी मी परी येतसे गा ।।१।।

भारत भक्ती हा सांप्रदाय जाण । केलासे निर्माण कलियुगी ।
कृष्ण परमात्मा झालो मी साकार । देण्या साक्षात्कार चैतन्याचा ।
पिवळ्या त्या पितांबराचीया खूण । उभारिले जाण स्मारक गा ।
वैजनाथ म्हणे ओम हे मुळाक्षर । आहे मी ईश्वर सर्वसाक्षी ।।२।।

प्रेम सेवा आणि एकता निर्माण । व्हावया कारण पंथ हवा ।
योग्य पंथ बारे असलीया विण । तरू शके कोण बारे प्राणी ।
घडलीया विण भक्ती ते अद्वैत । मी गा भगवंत नोहे प्राप्त ।
वैजनाथ म्हणे होतो मी साकार । यासाठी ईश्वर युगायुगी ।।३।।

पंथ सांप्रदाय उपासना जाण । भेद हे निर्माण होता लोकी ।
देण्या सत्यज्ञान धावे मी श्रीहरी । सांप्रदाय परी योग्य दावी।
दावितसे लोका भक्ती ते अद्वैत । मी गा भगवंत गीता मार्गे ।
वैजनाथ म्हणे ब्रह्म निरूपण । वेळ ऐसे जाण माझे राहे ।।४।।

दया शांति क्षमा शुद्ध सत्त्वगुण । जाणावे लक्षण साधूत्वाचे ।
भूत दया अंगी आहे ज्याच्या गुण । मी गा नारायण सदा तेथे ।
जात धर्म कुळ मज भेद नाही । ईश्वर मी पाही सकळांचा ।
वैजनाथ म्हणे ज्याचा शुद्ध भाव । तेथे मी गा देव उभा आहे ।।५।।

गीतारूपे माझा आत्म साक्षात्कार । राहे हा साचार युगायुगी ।
विश्वरूप दिले अर्जुना दर्शन । गीता म्या सांगून वेळे ऐसी ।
कर्तव्य साधन योग जाणा परी । दवी मी श्रीहरी वेळ ऐसा ।
वैजनाथ म्हणे ज्याची त्या ओळख । गीते माजी देख होतसे गा ।।६।।

आहे विश्वरूप ठायीच दर्शन । आपुलाले मन शुद्ध करा ।
नोहे जाणे लागे कुणा लागीदूरी । ठायी ब्रह्मपरी साक्षात्कार ।
मोक्षदाता गुरु जयासी भेटला । ठायी स्थिरावला ऐसा प्राणी ।
वैजनाथ म्हणे सद्गुरु वाचून । कदा ब्रह्मज्ञान प्रगटे ना ।।७।।

सगुण निर्गुण एक जाणा आहे । अनुभव पाहे बदलेना ।
चंदनाच्या सवे सुवास गा राहे । साखरेत पाहे जाणा गोडी ।
तैसे सगुणात रहे गा निर्गुण । शक्ती मूळ जाण एकची गा।
वैजनाथ म्हणे नामरूप आहे । अवतार पाहे भक्तासाठी ।।८।।

साधुसंत रूपे मी गा नारायण । नटलो गा जाण जगासाठी ।
वेळ ऐसा संप्रदाय मी निर्माण । भक्तासाठी जाण करीतसे ।
वाढावया लोकी भक्तीभाव धर्म । दावी सत्य कर्म अवतारे ।
वैजनाथ म्हणे वेदाचा सिद्धांत । सांगे मी अनंत वेळे ऐसा ।।९।।

गोप गवळणीसी दिला अनुभव । तारीले पांडव द्वापारी मी ।
ज्ञानरूप माझी उजळली ज्योत । निर्मियेली संत मालिकाते ।
वारकरी पंथ केला म्या निर्माण । ज्ञानेश्वर जाण बनुनीया ।
वैजनाथ म्हणे वेळे ऐसी गीता । मज भगवंता सांगू लागे ।।१०।।

बौद्धावतार मी झालो ज्ञानेश्वर । लोपता साचार सत्य ज्ञान ।
संत मालिकाते करुनी निर्माण । भक्ती गा सगुण वाढविली ।
तोच ज्ञानरूपी जाणा मी ईश्वर । झालो अवतार कलंकी गा ।
वैजनाथ म्हणे भेट माझी जाण । बरे ही सगुण शेवटची ।।११।।

कृष्ण प्रेमाचा मी चैतन्य पुतळा ।  बहु कळवळा भक्ताविशी ।
राहुनीेया निराकार गा निर्गुण । नाहे पडे जाण चैन मज ।
तयासाठी नामरुपे मी सगुण । भक्तांसाठी जाण युगायुगी ।
वैजनाथ म्हणे वेळेच्या प्रमाणे । भक्तांसाठी जाण लिला माझ्या ।।१२।।

पिवळे-केशरी बारे गा निशाण । पितांबर जाण कृष्णाचीया ।
भारत भक्ती हा सांप्रदाय परी । सावधान तरी सर्व लोका ।
जगजनार्दना रुपी वारी करा । ओळखावा खरा पांडुरंग ।
वैजनाथ म्हणे आत्मज्ञानाविण । किरकिर जाणा नोहे मिटे ।।१३।।

आत्मा-परमात्मा मी एकची गा आहे । परमात्मा पाहे पांडुरंग ।
आपणा वेगळी करू नका वारी । पहावी पंढरी शोधुनिया ।
आत्म स्वरूपाची झाली ज्या ओळख । जवळी मी देख पांडुरंग ।
वैजनाथ म्हणे जाता मी तू पण । देव भक्त जाण नूरे भेट ।।१४।।

संत साधू अवतारा माजी पाही । उपयोगी नाही जाणा भेद ।
ब्रह्म साक्षात्कार अवघाची आहे । सगुणाची पाहे ओळख गा ।
ब्रह्ममय दृष्टी सद्गुरूच्या वीण । कदाकाळी जाण होईच ना ।
वैजनाथ म्हणे तळमळी विण । सद्गुरुची जाण नोहे भेट ।।१५।।

लागे एशीयाची ब्रम्हानंदी ध्यान । सद्गुरु चे ज्ञान ठसले ज्या ।
सद्गुरु ज्ञानयोगी आत्मा राहे । परब्रम्ह आहे जेथे भान ।
जन्म-मृत्यूच्या सुटे मिथ्या भास । भेटला जयास सद्गुरु हा ।
वैजनाथ म्हणे प्रत्यक्ष ईश्वर । सद्गुरू साचार करीत तसे ।।१६।।

सर्व संप्रदाय यावया एकत्र । उभारिले छत्र वेदांताचे ।
भारत भक्ती हा संप्रदाय परी । तारक संसारी मानवासी ।
महाराष्ट्री लांडगे हे वडगाव । त्या ठाई जाणीव झाली मज ।
वैजनाथ म्हणे तोचि अनुभव । कलंकी की मी देव सांगे लोका ।।१७।।

जपताप क्रिया मिथ्या नेमधर्म । नोहे कळे वर्म भक्तीचे जा ।
योग याग विधी मिथ्या हे साधन । तेणे भगवान आकळेना ।
संत समागमे लाभे मी श्रीहरी । तळमळ परि शुद्ध ज्याची ।
वैजनाथ म्हणे भक्तीचा विचार । संताची साचार योग्य देती ।।१८।।

कौरव कारण लागले दुर्गुण । नोळखीले जाण तेणे देवा ।
तयासाठी गीता करून निर्माण । ईश्वरे म्या जाण माया केली ।
देऊनी जागृती अर्जुना कारण । केले निर्दाळण कौरवांचे ।
वैजनाथ म्हणे युगायुगी राहे । वेळे ऐसे पाहे कार्य माझे ।।१९।।

माझे देश माझे राष्ट्र माझा गाव ।  लागलीसे हाव कली माझी ।
स्वार्थासाठी आपसात हे भांडती ।  कर्तव्य नेणती बारे सत्य ।
स्वार्थामुळे लाेपले गा सत्य ज्ञान ।  गेले विसरून देव धर्म ।
वैजनाथ म्हणे हरी भक्ती वीण ।  दिवस कठीण बारे लोका ।।२०।।

मानवा वेगळा मानव हा नाही ।  मानव गा पाही सर्व एक ।
सकाळा कारण एक मी ईश्वर ।  आत्मसाक्षात्कार एक सर्वा।
ज्याचा तेणे करा पूर्ण हा विचार ।  कोठनी साचार जाती-धर्म ।
वैजनाथ म्हणे ज्याचे शुद्ध मन ।  जाईल कोठून वाया ऐसा ।।२१।।

संत संगतीने वासना जळती ।  मार्ग खुले होती भक्तीचिया ।
सत्य सदाचार हाची धर्म आहे ।  मानवाचा पाहे जाणा खरा ।
साधु-संत हीच योग्य शिकवण ।  शुद्ध आचरण बनतसे ।
वैजनाथ म्हणे अध्यात्म जागृती ।  घडे जया प्रति धन्य होय ।।२२।।

साधावे ऐसे जगाचे कल्याण ।  जेणे मी तू पण लय जाय ।
एका आईचीया अवधी लेकुरे ।  ईश्वर हा बारे दुजा नाही ।
आहे विश्व माझे एकची गा घर ।  आत्मा मी साचार सर्वा एक ।
वैजनाथ म्हणे नटलाे ईश्वर ।  अवघा संसार बारे मीच ।।२३।।

संत मालिकाते वेळेच्या प्रमाण । श्रीहरी मी जाण करीतसे ।
वेळे ऐसी संप्रदायिचिया खून । करावी निर्माण लागतसे ।
लोपताहे धर्माचिया सत्य ज्ञान । मी भगवान धावत से ।
वैजनाथ म्हणे भक्ती प्रेमासाठी । होय जगजेठी साकार मी ।।२४।।

निष्पाप भूमिका असलिया वीणा । गीता नये जाणा सांगताते ।
संता मुखे करीतले निरूपण । मे गा नारायणा वेळे ऐसे।
शुद्ध भूमिका ते असलिया विण । हृदयात मी जाण नोहे देई ।
वैजनाथ म्हणे योग्य वेळी धरी । जाणा मी श्रीहरी अवतार ।।२५।।

मानवता हाची आहे खरा धर्म । वेगी सत्य कर्म जागवावे ।
सत्य कर्म बारे जागविल्यावीण। मानवा हा जाणा नोहे सुखी ।
ज्याचा तया लागि होई साक्षात्कार । अध्यात्म साचार जागृतीने ।
वैजनाथ म्हणे जया सत्संगती । समाधान शांती याचं मार्गे ।।२६।।

ज्ञानज्योत वेधी प्रकाशित करा । सांप्रदाय धरा बारे योग्य ।
विश्वरूप बारे व्हावया दर्शन । एकाग्र ते मन वेगी करा ।
कृष्णा परब्रम्ह अवघा मी आहे । खून कळे पाहे गीता मार्गे ।
वैजनाथ म्हणे नोहे रिता ठाव । भक्त आणि देव मीच सर्व ।।२७।।

एकेश्वर कृष्णपाठी गा जाणा हे । अठठवीस पाहे अभंग गा ।
भारत भक्ति गा संप्रदाया वीण । मानव हा जाणा स्थिरावेना ।
शके अठराशेपंच्याऐंशी आहे । संवत्सर पाहे शोभन नाम ।
चैत्र वद्य प्रतिपदा मंगळवार । दिवसाच्या चार बारे आज ।
पिंपळगाव ह्या बारे निपाणीसी । केला परियसी कृष्ण पाठ ।
शुद्ध भावे जेगा करिती पठाण । कृष्ण रुपी जाण स्थिरावती ।
वैजनाथ म्हणे कदापी श्रीहरी । विसर न धरी सज्जनांचा ।।२८।।

भक्त जनाचीया घ्यावया कैवार । धावे मी ईश्वर युगायुगी ।
दत्त दुर्वासा ने झालो मी साकार । आता अवतार कलंकी हा ।
वैजनाथ रूपे बारे ज्ञान ज्योत । झालो भगवंत कलियुगी ।
वैजनाथ म्हणे ज्ञानी भक्तविण । नव्हे मी सगुण लाभे कुणा ।।२९।।

।। श्री कलंकी देव वैजनाथ कृत एकेश्वरी कृष्ण पाठ संपूर्णम् ।।