बेबीचे शिक्षण जेमतेम चौथ्या इयत्तेपर्यंत झाले बेबीचे आता १४ व्या वर्षात पदार्पण होताच.त्यांना लग्नाची स्थळे येऊ लागली त्यांची लग्न करण्याची इच्छा नव्हती.परंतु वडिलांपुढे त्यांचे काही चालण्यासारखे नव्हते बेबी यांना अजून दोन भावंडे होती.एक बहिण दगडाबाई व बंधू नाना यांच्या ही जबाबदारी आई-वडिलांवर होतेस.त्यामुळे सन १९६७ साली वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा धांदरफळ येथील,श्री नाना रामभाऊ वाकचौरे यांच्या बरोबर विवाह संपन्न झाला. ते कपडे शिवण्याचे काम करीत. सहा महिने आपल्या सासरी धांदरफळ येथे राहिल्यानंतर त्यांच्या सासरची परवड सुरु झाली.त्यांना अनेक शारीरिक व्याधीने पछाडले होते.त्यांची अंतःस्फूर्ती खुलवताना त्या वेदनेने मोठ्याने ओरडत असत.इतर लोकांना वाटायचे त्यांना भूत-पिशाच्चने पछाडले आहे. म्हणून त्यांना नगर जवळील मिरवली बाबांच्या( मूळस्थान मीनाथ सिद्ध) पहाडावर नऊ लागले.वर्षातील जवळजवळ सात-आठ महिने तरी त्या तिकडे राहत. त्यांना चार अपत्ये झाली पैकी दोन आपत्य मीना,फकीरा हे दोघेच जगली. लग्नानंतर सुमारे १४ वर्षे त्यांना वनवास घडला.त्यांचा निमगाव,हनुमंतगाव,पोहेगाव.राजापूर,वडगावलांडगा,संगमनेर ठिकाणी रहिवास झाला.त्यांचे यजमान टेलरचा व्यवसाय करून त्यांना पैसे पुरवत परंतु त्यांची फारच तारांबळ होत असे. त्यामुळे नगरच्या पहाडावर असताना त्यांना बऱ्याच वेळी माधुकरी मागून उदरनिर्वाह करावा लागला पाणी तर त्यांना खालून पहाडावर न्यावे लागेल.त्या तेथे दोन बालकांसंवेद राहत यजमान अधूनमधून येऊन जाऊन असत.इकडे आई-वडिलांचे ही परिस्थिती जेमतेम एकदा एक दीपावलीत सुद्धा त्यांना केवळ बटाटे उकडून खाऊन साजरी करावी लागली.मग ते तरी आपल्या मुलीला कोठून मदत करणार नगरच्या पहाडावर असताना,त्यांचे चार महिन्यांचे मूल निर्वतले,परंतु त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी कोणी मदतीस आले नाही. त्यावेळी बेबीमाईनी स्वतः आपल्या बालकाचा अंत्यविधी स्वहस्तये पार पाडला. दुखी अंतकरणाने त्या नगरच्या पहाडावरून खाली उतरल्या.
ऊन मी म्हणत होते. अनवाणी पावलांनी त्या चालल्या होत्या.एस टी भाडेही त्यांच्याजवळ नव्हते.तरी त्या स्टँडवर त्या पोहचल्या अशावेळी भगवांत कृपावंत झाले.त्यांनी मुजावर बनवून त्यांना मदत केली,व त्या वडगाव लांडग्यास परतल्या. हा १४ वर्ष त्रास त्यांनी सहन केला.त्यांच्या नगरच्या पहाडावर फेर्या सुरू होत्या.नगरच्या पहाडावरील मुजावर ह्यावेळी म्हणाला. आता तुमचा शेवट होणार व तुमचा विधी येथेच करावा लागेल.त्यावेळी बेबी माया बरोबर आलेले सर्वजण निघून गेले.त्या बेशुद्ध होऊन पडल्या होत्या प्राण निघून जाणार होता.एवढ्यात नाथांनी मानवी रूप धरून त्यांच्या मुखात अमृत तीर्थ टाकले,व त्यांना उठुन बसवले आणि त्यांना आता ९ वर्ष गाणगापूरला जाण्यास सांगितले.त्यानंतर त्या पुन्हा वडगाव परतल्या.त्यावेळी त्यांच्या छोट्या भगिनी दगडाबाई यांचे नुकतेच आठ-दहा दिवसांपूर्वी लग्न झाले होते. परंतु यांना बोलावणे पाठवले नव्हते.दोघींनी एकमेकींना बघितल्यावर त्यांचे हृदय दाटून आले.व त्या एकमेकींना कडकडून भेटल्या यातच भगिनी दगडाबाई हीस शक्ती पात झाला.व त्यांनाही पुढे आध्यात्मिक कृपा होउन त्यांच्यासारखे आदेश वगैरे सुरू झाले
आता बेबीनाथ माया यांचे गाणगापूरचा फेऱ्या सुरू झाल्या त्यांच्याबरोबर गावातील श्री पुरुष आठ दहा जण असतात.काही वेळा त्यांनी पायी प्रवास केला गाणगापूरास त्यांना श्रीदत्तांची भेट होत असे.तेथून निघण्याचे त्यांचे मन होत नसे. त्या श्री दत्त पाशी हट्ट धरून बसत श्रीदत्त त्यांना समजावून सांगून घरी पाठवत असत.बऱ्याच वेळेला ते अधिष्ठानाणे त्यांच्याबरोबर असत व पुढे मी सगुण रुपाने तुला भेटेन असे,वचन देत.तेव्हा कुठे त्या शांत होत असत.बेबी माई यांना सहा महिने बिलकुल जेवण जात नव्हते.तरी शौचालय वाटे रोज मालमलीछ पडत असे.एक-दोन महिने त्यांच्या रोमारोमातून पू बाहेर पडत असे.त्यांच्या शरीराचा केवळ सापळा राहिला होता.त्यांचा हा त्रास म्हणजे कुंडलिनी जागृती अवस्थेचा काळ होता. हे पुढे त्यांची कलंकी दहावा अवतार ईश्वर वैजनाथ भगवान यांची भेट झाली,तेव्हा खुलासा झाला.एकदा त्या गाणगापुरास गेल्या तेथील एका भक्ताच्या अंगात आले व तो बेबीमाई यांना दरडाऊ लागला तेव्हा बेबीमाई यांनाही अंतस्पुर्ती आली व त्यांची जोरदारपणे नानाविध भाषेत प्रश्नोत्तरे सुरू झाली.शेवटी तो भगत पुजारी बेबीमाईना शरण आला व माफी मागितली.त्यांच्यात काही वेगळीच शक्ती असल्याची त्याला प्रत्ययता आली.
असेच एकदा बेबीमाई यांना हाजी मलंग येथे जाण्याची इच्छा झाली.त्यांचे वडील श्री चंद्रभान मिस्तरी यांना सोबत घेऊन तेथे गेल्या मुसळधार पावसात ओल्याचिंब झाल्या होत्या.जवळच्या शिदोरीवर माकडांनी झेप मारून पिशवी पळवली होती.श्री चंद्रभान मिस्त्री यांनी एका सज्जनाला विनंती करून तेथे आडोशाला जागा मिळवली.तेथे त्यांनी विश्रांती घेऊन ते मूळ स्थानाकडे जाऊ लागले जिथे स्त्रियांना प्रवेश नव्हता तरीपण बेबीमाई याना अंतस्फुर्ती आली व त्या दर्ग्यावर नाचत गेल्या व अदृश्य दर्शन घेऊन त्याला प्रदक्षिणा घालून आल्या तेथील पुजारी व मुजावर आकस्मित होऊन पहात राहिले कारण आतापर्यंत अशी कुठल्याही स्त्रीची हिम्मत झाली नव्हती श्री चंद्रभान मिस्तरी मात्र भयाने कापत होते.आपली पोर आता उगीच वाद करणार व हे लोक आपल्याला हाकलून देतील अशी भीती त्यांना वाटत होती.परंतु तसे काही न झाल्याचे त्यांना सुद्धा आश्चर्य वाटले.
