श्री चंद्रभान मिस्तरी कुटुंब नाशिक येथील डिंगर आळीतील मुळे पाटील यांच्या वाड्यात राहत होते. चैत्र महिन्याचे ते दिवस होते संन १९५३ सालातील १३ एप्रिलचा मंगळवारचा दिवस उजाडला होता. सकाळी सहा वाजल्यापासून भागीरथी बाईंना कळा सुरू झाल्या नंतर काही वेळाने गर्भावर नागाची छाया पडली. त्या देहपान हरपल्या नंतर गोडस अशा गौरी स्वरूप बालिकेचा जन्म झाला. तेव्हा सकाळी सात-साडेसात ची वेळ होती. घरातील पहिली कन्या म्हणून तिला सर्वजण तिला बेबी या नावानेच पुकारू लागले. पुढे कलंकिनी बेबी नाथ मातेच्या लिखाणातून विष्णूच्या नाभी पासून म्हणजे बेंबीपासून जन्म झाल्याकारणाने बेबी हे नाव धारण केल्याचे वर्णन आले आहे. तसेच त्यांचे माता-पिता म्हणजे श्री चंद्रभान व सौ भागीरथी हे दक्ष राजाच्या वेळी क्षत्रिय घराण्यात होते. तसेच रामअवताराच्या वेळी तेथील क्षत्रिया घराण्यात त्यांचा जन्म होता व सीतेच्या रावणाकडून सोडविण्यासाठी त्यांची मदत झाली होती. म्हणून त्यांच्या इच्छेपोटी ह्या घराण्यात कलंकी मातेचाने जन्म घेतला.बेबी बालिकेसह श्री चंद्रभान मिस्तरी यांचे कुटुंब पुन्हा जवळेकडलग येथे आले या बालिकेचे इतर मुलींपेक्षा वागण्यात बोलण्यात चालण्यात खेळण्यात तसंच वेगळेपण होतं. परंतु ते त्यांच्या पालकांच्या त्यावेळी लक्षात यायचे नाही बेबी चे नाव जवळे येथे शाळेत घातले होते. परंतु त्यांचा अभ्यासात मन रमत नसे त्या बऱ्याच वेळेला आढळा नदीच्या किनारी असलेल्या अडलेश्वराच्या मंदिरात जाऊन बसत असत व एकट्याच शिवलिंगाशी बोलत असत.हा शिव माझ्याशी का बोलत नाही याबद्दल त्यांच्या बालमनाला खेद वाटत असे. कधीकधी गाभाऱ्यातून आवाज निघत असे “बाळ अजून लहान आहेस पुढे”माझे सांगून तुला भेटेल.
तरीसुद्धा त्या बालमनाचे समाधान होत नसे. बेबी बालिका सात-आठ वर्षाची असताना शाळेत न जाता आढळेश्वराच्या मंदिराबाहेर ठाण मांडून बसली व तिने मनोमन संकल्प केला की मला जर भगवंता तू आता भेटला नाहीस तर मी माझ्या देहत्याग कारेन. ते दिवस उन्हाळ्याचे होते जमीन क्षनोक्षणाला तापत होते. दुपारचे बारा वाजले होते बालिकेचा हट्ट पाहून भोळ्या शंकराला राहवले नाही.त्यांनी मंदिरातून बाहेर येतोय असे तिला भासवले व बेबी बालिकेला मिठी मारण्यासाठी पुढे सरसावले.परंतु त्यांचे ते जटाधारी व त्रिशूल डमरूधारी भयंकर रूप पाहून बेबी बालिका घाबरली.तिला भयाने कप सुटू लागला आणि ती मागच्या पाऊली पळू लागली.त्यावेळी भगवान तिला म्हणाले बाळ ह्या जन्मी तुला बरेच व्याधी दुःख भोगावे लागेल.तरी तू नाथांकडे जा मग मी तुला पुढे भेटेन. असे म्हणून ते अदृश्य झाले व बेबी बालिका घरी परतली.
