इच्छुक भाविक खाली दिलेल्या पेमेंट ऑपशन्सचा उपयोग करून ग्रंथ पुस्तक ऑर्डर करु शकतात.
त्यातून जमा होणाऱ्या निधितून पुढील ग्रंथ प्रकाशन कार्यास सहकार्य लाभेल

परमस्थिती गीता
परमस्थिती गिता हा एक अभूतपूर्व ग्रंथ आहे. सत्य सदाचार व ब्रह्मसनातन हाच खरा धर्म होय व त्याचे प्रतिपादन कलंकी देवांनी या ग्रंथाद्वारे केले आहे. श्रीकृष्णार्जुन संवाद सुध्दा ह्या ग्रंथ पुस्तकात आहे.

नवरत्न पाठ
श्री पूर्ण परब्रह्म कलंकी देव व श्री संत बेबीनाथ माया कृत नवरत्न पाठ. हे ग्रंथ मालिका पुस्तक वैजनाथ पाठ, आदिशक्ती पाठ, दत्त पाठ, राम पाठ, कृष्ण पाठ, विठ्ठल पाठ, शिव पाठ, ओंकार पाठ, नवनाथ पाठ अशा ११ पाठांच्या अमूल्य ज्ञान भंडाराने अलंकृत आहे.

स्वानंद लहरी
प्रस्तुत ग्रंथात स्वानंद लहरी म्हणजे आत्मानंद स्थिती म्हणजेच सहज स्थितीचा अनुभव कसा प्रगट होतो या विषयीचे विवेचन आले आहे. शुध्द भक्तीप्रेम हेच खरे स्वानंद लहरीचे उगमस्थान आहे. हे यात स्पष्ट करतांना कलंकी भगवंतानी अनेक दृष्टांत रुप उदाहरणे देऊन सद्गुरु कृपेचे महत्व विषद केले आहे.

कलंकी आत्मबोधांमृत
आत्मानुभव हा परमार्थातला श्रेष्ठ दर्जाचा पाया आहे. तो दर्शविण्यासाठीच युगायुगी परमेश्वराला साकारत्व पत्करावे लागले व मी कोण हे दिग्दर्शन करून अंतःस्फुर्तीची स्पष्टता दाखवावी लागली.
ह्या घोर कलियुगात पूर्ण परब्रह्म श्री. कलंकी अवतार ईश्वर वैजनाथ भगवंतांनी हेच विवेचन स्पष्ट, सुलभ व रसाळ अशा गद्यमय मराठी प्राकृत भाषेत “कलंकी आत्मबोधांमृत” या ग्रंथात ग्रंथित केले आहे.

ध्यानधारणा आणि भक्ती रहस्य
‘ध्यानधारणा’ ही नानाविध तर्हेने करण्याचा मनुष्य प्रयत्न करतो. परंतु कलंकी वैजनाथ भगवंतानी ह्या ग्रंथात मूळ ईश्वराकडे अवधान ठेवून ध्यानधारणा कशी साधायची हे स्पष्टपणे सांगितले आहे.
आत्म्याचे ध्यान लागण्यासाठी काय करावे व जनता जनार्दनातला ईश्वर ओळखून आपल्या सद्गुरुकृपेने आत्म्याचे ध्यान कसे साधून घ्यावे ह्याचे प्रस्तुत १९५ वचनांच्या ह्या छोट्याशा ग्रंथात विवेचन केले आहे.

प्रेमरहस्य तरंग
यज्ञयाग व होम ह्यातच काही जण अडकून पडलेले आहेत व असे कर्मठ लोक अज्ञानांची दिशाभूल करतात. त्यामुळे खरे आत्मज्ञान काय याची भाविकांना जाणिव होत नाही; म्हणून श्री. कलंकी वैजनाथ भगवंतानी आत्मशांती महायज्ञ ह्या ग्रंथात खरा यज्ञ कोणता हे दाखवून दिले आहे.

कलंकी गिता सत्यनारायण
श्री. कलंकी देवांनी प्रस्तुत ग्रंथात ब्रह्मत्मा वर्णन, ओंकार स्वरुपाचे विराट स्वरुप दर्शन, संताचे कार्य, संत सिध्द, सत्पुरुष अवतार याची स्थिती व वर्णन, भागवत धर्माची माहिती श्री. कलंकी अवतार येण्याच्या अगोदर वैकुंठातील विचार, खरा सत्यनारायण कोण व त्याची कशा प्रकारे पूजा करावी याचे यथासांग वर्णन व इ. ब्रह्मज्ञानाचे सार ग्रथित केले आहे. ग्रंय छोटा नित्य पठनीय आचरणीय, एहीक जीवनात सुखशांती मिळवून देणारा व आत्मोध्दारक असाच आहे.

अभंगावली
प्रस्तुत ग्रंथात श्री. संत कलंकी बेबीनाथ माया यांच्या ब्रह्मनाद ध्वनीतून निघालेल्या लाखो अभंगांपैकी १००० अभंग सादर करण्यात आले आहे.
दिसायला साध्या असणा-या ह्या साध्वीच्या ज्ञानाची कल्पना वाचकांना यावी म्हणून हा सदर ग्रंथ प्रस्तुत करण्यात आला आहे.

सत्यज्ञान बोध ग्रंथ
प्रस्तुत ग्रंथात श्री. संत कलंकी बेबीनाथ माया (माताजींनी) भक्ताच्या सबबीवर शंकाकुशंकावर मनाच्या व निश्चयाचा ढिलेपणावर भक्तीशैथील्यावर मर्मभेदी प्रहार करीत अनेक अंधश्रद्धेचा समाचार घेतला आहे. यातील प्रत्येक सिद्धांत हा अनमोल रत्नासम आहे. वाचकांना ह्या ज्ञानाची कल्पना वाचनांती येईलच व त्यामुळेच संत स्वरुपी असलेल्या बेबीनाथ माया ह्या खरोखरच ब्रह्मस्वरूपिनी आदिशक्ती होत याची जाणीव होईल. सदभक्तांना त्यामुळे आपले उर्वरीत जीवन त्याच्या ज्ञानाचा व मार्गदर्शनाचा लाभ घेऊन सार्थकी लावता येईल.

ध्यानसाधना
इतर योगसमाधी पेक्षा ही भावसमाधीच सर्वश्रेष्ठ होय असे हया सदरहू ग्रंथातून स्पष्ट केले आहे. प्रस्तुत ग्रंथात सद्भक्तांना ध्यानसाधनेसाठी मार्गदर्शन, ध्यानसाधनेचे महत्त्व आणि सद्गुरूंचे ध्यानसाधना मार्गात प्रयोजन हयांचे विस्तृतपणे स्पष्टीकरण केले आहे. ब्रह्मानंदी ध्यान, स्वरुप ध्यान व विश्वरुप ध्यान हे प्रकार श्री. कलंकी वैजनाथ भगवान यांनी आपल्या ध्यानधारणा ग्रंथातून सांगीतले असले तरीही त्यांनी भावसमाधीच श्रेष्ठ मानली आहे. त्याचेच विस्तृत स्पष्टीकरण श्री. संत कलंकिनी बेबीनाथ माया यांच्या ध्यानसाधना हया छोटयाशा ग्रंथात विशद केले आहे.
टिप: ग्रंथांची एकूण किंमत ही (ग्रंथ छपाई किंमत + पोस्टल डिलिव्हरी चार्जेस) जोडून नमूद करण्यात आली आहे याची भाविकांनी कृपया नोंद घ्यावी
