ध्यानसाधना

।। ॐ ।।
।। श्री सद्गुरु दुर्वास दत्त प्रसन्न ।।
प्रस्तावना

अव्यक्तं व्यक्तीमापन्नं मन्यते मामबुध्दयः
परं भावमजानन्ते ममाव्ययमनुत्तमम् ।।
(गीता ७/२४)

अव्यय व उत्कृष्ठ स्वरूपातील कर्तुमाकर्तुमशक्तीची प्रत्यक्षता असलेल्या विभूति विरळयाच! त्यांच्याठायी शुध्दअंर्तस्फुर्तिची स्पष्टता असते व पाचवा वेदही लुप्त असतो. पण अज्ञान लोक त्यांना जाणू शकत नसल्यामुळे काही महान विभूति अज्ञातच राहतात. त्यापैकीच एक अद्न्यात महान विभूति म्हणजे “श्री सद्गुरू कलंकी वैजनाथ महाराज” होत ! त्याच्या सिध्दहस्त लेखणीतून सहा शास्त्र, चार वेद व अठरा पुराणे यांचे सार बाहेर पडले. त्यांच्याच शिष्या “श्री संत कलंकिनी बेबीनाथ माया” याही प्रसिध्दी पराड़मुख असल्यामुळे आज पोवेतो फारच थोडयांना ज्ञात आहेत. त्यांच्या अक्षरज्ञान भांडारात अनेक ग्रंथाची निर्मिती झाली.
संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगे येथील एका लहानशा खेडयात त्यांचे अध्यात्मिक कार्य चालू आहे. गृहस्थाश्रमातील प्रतिकूल परिस्थितीतून अध्यात्मिक उच्च अवस्था गाठणाऱ्या या महान विभूतीच्या अक्षरज्ञानाची आपणास अल्पशीका होईना. कल्पना यावी म्हणून यापूर्वी आम्ही त्यांचे ३ ग्रंथ प्रकाशीत केले आहेतच. त्यांचे हे चतुर्थ प्रकाशन “श्री दत्त कलंकिनी अध्यात्म मिशन” आपणासमोर आणत आहे.
पतंजली माहामुनीनी अष्टांग योगीची यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशी आठ अंगे सांगीतली आहेत. त्यातील ध्यान येागाला फार महत्व दिले आहे व यावर अनेक विद्वानांनी पुस्तके लिहून विविध प्रकारच्या ध्यान पध्दति जगासमोर मांडल्या आहेत. परंतु संत विभूतीचे कुठल्या प्रकारचे ध्यान असते हे स्वानुभवाशिवाय कोण बरे सांगू शकेल ? म्हणूनच “श्री संत कलंकिनी बेबीनाथ माया” यांच्या ब्रह्मनाद ध्वनीतून ध्यानसाधना हा ग्रंथ सर्वजनहितार्थ प्रकट झाला आहे.
संत् सदगुरु ब्रह्मवेत्ते विभूतींचे परमात्म्यासवे ब्रह्मनाद ध्वनीतून संभाषण चालू असते. त्यातच त्यांना अनेक पद्यमय व गद्यमय ध्वनी प्रकट होत असतात. व हया विभूती ब्रह्मानंदी तल्लीन असतात. त्यांच्या हया ध्यान अवस्थेला भावसमाधी असे म्हणतात. इतर योगसमाधी पेक्षा ही भावसमाधीच सर्वश्रेष्ठ होय असे त्यांच्या हया सदरहू ग्रंथातून स्पष्ट होते. तसेच सद्भक्तांना ध्यानसाधनेसाठी मार्गदर्शन, ध्यानसाधनेचे महत्त्व आणि सद्गुरूंचे ध्यानसाधनामार्गात प्रयोजन हयांचे विस्तृतपणे स्पष्टीकरण केले आहे. ब्रह्मानंदी ध्यान, स्वरुप ध्यान व विश्वरुप ध्यान हे प्रकार श्री कलंकी वैजनाथ महाराज यांनी आपल्या ध्यानधारणा ग्रंथातून सांगीतले असले तरीही त्यांनी भावसमाधीच श्रेष्ठ मानली आहे. त्याचेच विस्तृत स्पष्टीकरण “संत कलंकिनी बेबीनाथ माया” यांच्या ध्यानसाधना हया छोटयाशा ग्रंथात विशद केले आहे. तसेच माताजींनी अनेक परमार्थातील गुढगुहय हया ग्रंथात विदित केले आहे. ते अध्यात्मिक साधकांच्या ध्यानी येईलच. त्यावरुन माताजींच्या अध्यात्मिक अवस्थेची सुध्दा त्यांना कल्पना येईलच.
हा ज्ञानग्रंथ केवळ ज्ञान म्हणूनच नव्हे तर साधना ग्रंथ असून त्यातील अनेक सूचनांची साधकाला आपल्या अध्यात्मिक प्रगतीत मदत होईलच तरी आपण सर्व सज्जन भक्तांनी त्याचा सदूपयोग करून आपली जीवननौका किनारी लावावी. त्यासाठी आपणास सदगुरु समर्थ “श्री कलंकी वैजनाथ महाराज व कलंकीनी बेबीनाथ माया” यांचा आशिर्वाद लाभो ही त्यांच्या चरणी प्रार्थाना.

।। जय जय दत्तराज माऊली ।।
।। जय जय वैजनाथ माऊली ।।
।। जय जय बेबीनाथ माऊली ।।