
श्री संत कलंकी बेबीनाथ माया वाढदिवस संदेश
शनिवार दि. ८-४-२०१७
गुरुवार दि. १३-४-२०१७
।। गुरु ब्रम्हा,गुरु विष्णु,गुरु देवो महेश्वरा: ।।
।। गुरु साक्षात परब्रम्हा परमेश्वरा: ।।
।। श्री गणेशाय नमः ।। श्री गुरु गणेशाय नमः ।।
।। वैजनाथ रामकृष्ण ।। ॐ सोहं परब्रम्हाय नमः ।।
श्री. संत कलंकिनी बेबीनाथ माया यांच्या कृपा आशीर्वादाने मज निमित्यास धरून लेखणी चालवणारा व बोलावणार गुरुदेव असून मला यातले काही ज्ञान नाही व नव्हते.ते आजही नाही,हे श्रोत्यांनी जाणून ह्या वाढदिवसी मंगल प्रसंगी सावचित्त होऊन माताजींचा संदेश ग्रहण करावा अशी मज पामराची नम्र विनंती.
अरे भक्त जन हो वाढदिवस हा मुळ माझा नाही.कारण मला वाढीव दिवस किंवा कमी दिवस असे काही नाही.गंतोतरीने आयुष्य वर्धनी तुम्ही किती मोजाल,युगांन युगी कालमान रात्री पांघरून मी आहे तशीच आहे.मी नव्हते किंवा आहे कि जाणार असे कालमान मला त्रिकालीं व भुतकाली,भविष्यकाली व वर्तमान काळाचे काहीही साकडे नाही.मी आहे होते अन उद्या हि असणार असा माझा नित्यकाळ व नित्यानंदात मी,ब्रम्हानंदिनी ब्रम्हा परम पुरुषासवे परमानंदाच्या भानी तल्लीन असते हे जाणून घाव्ये.मला जडत्व पांघरून या युगात आयुष्याचे गणित शृष्टि नियमाप्रमाणे जरी लागले,तरी मी स्वइच्छा धारी कार्य कारणी मुळ कळा चित्त स्वरुपिणी माझ्या स्वरुपात परब्रम्ही स्थित राहुन इकडच्या भानाशी भासांतराने कार्यरथ विदेही चालवते.परंतु या मृगजळी माया जडत्वी कळेंशी जडत्वाचा भास धरून देव भक्तीचा आनंद घ्यावासा वाटतो.ती मी इच्छा जण उद्धारासाठी अलंकाराने भुषा घेतली व व्यापले व व्यालपले होते व व्यापकच राहणार.
हे विश्व माझे आहे,माझ्या विस्ताराचे प्रतीक मीच पाहुन या जडत्वाच्या वस्त्राप्रमाणे उपभोग घेऊन अनुभवाला जागवते आहे.मी गेल्या दहा अवतारी व्यापकत्व भोगून ब्रम्हांसवें कार्य मायेने लीला करून युगाप्रमाणे कार्य केले.ब्रम्हाचा आकार मीच शक्ती धरुन मायेने रचना करुन जडत्वाला भासांतरी उरते,नाहीतर मीही निच्चळ निरामयी उरणारी मुळ शक्ती होते व आहे व राहणार आहे.माझ्या मुळ गुरु कुलाचे गुरुत्व व स्वामित्व राखणारी मीच आहे,माझ्या गुरुकुलाला कुल नाही. आहे ते कसे तर कुलाचा कुलपणा कार्यानेच प्रवृत्त होऊन प्रवृत्तीशी संघर्ष करण्यासाठी निष्काम योगाला कुलत्व लावले जाते.कारण कुल व कुळ यात फरक आहे.मला कुलस्वामिनी म्हणतात.मी कुळाची स्वामींनी मायेने आहे व कुलाची स्वामींनी शक्तीने आहे.कुळ कुळाचार धर्म हा साधु संताना किंबहुना गुरुलाही नाही.कारण साधु संत हे जडत्वाचा भास घेऊन विदेही होतात व गुरुही विदेही असुन देहात भासतात.म्हणुन त्यांना कुळ कुळाचार नाही,कारण त्यांच्या ठिकाणी अजन्माचा जन्म भास माझ्या योग मायेच्या रुपाने होतो व षंडन्यास होऊन जडाचा भासच उरतो व मी ऊर्ध्व कला त्या ठाई चित्त स्वरुपिणी मी,माझेपण लेऊन ज्ञानाचे संभाषणी कुलस्वामिनी साधु संत व व सती सद्गुरु स्वरुपाची प्रतिरुपता जाणिवेने जाणिवेत शक्ती येते व आले आहे व येणार आहे.
अरे सद्भक्ता माझे अंतःकरण हे विश्वधारी आहे.परंतु यात निर्भेद निष्काम निस्वार्थीची ब्रम्ह बिजे असुन त्यांच्या ओलाव्याला मी माझ्या अंत विश्वाची पातळी धरुन जल सिंचन हे अमृत कुंडातुन देते.तो कुंड माझ्या महाकारण देहात आहे होता व आजही आहे.तू म्हणशील महाबिजे हे कशासाठी व कोठन आणली.अरे हे बिज माझ्या निजस्वरुपात पाझरतात.या बिजांना अंकुरात टाकण्यासाठी माझी फार तळमळ असते.हे बिज म्हणजे माझ्या शक्तीचे प्रतीक आहे कारण जशी मानवता बिजे संयोगाने तयार होऊन निर्मित रक्त्त पिंडे वाढतात तशी माझी संयोगता हि निष्काम निर्लोभ असुन निरलेपाने ब्रम्ह शक्ती योग्य घडतो.तो महाकारणाने हे समजून घे,कारण मी ब्रम्ह योगिनी असुन ब्रम्ह स्वरुपाची गीता लिहिली व लिहीत आहे व लिहिणार आहे.माझ्या शुभ इच्छा या शुभ लाभदायी ज्ञान योगाने पूर्ण होण्यासाठी धडपडत आहे. मला द्वैताने किंवा लहान मोठे पणाने कोनत्याही जीवाला प्रोत्साहान देऊन कमी जास्त करायचे नाही,कारण विश्व हि माझेच देहाचे प्रतीक आहे. — असुन त्यांना द्वैताने कसे पाहु.परंतु मला ह्या जिव हितासाठी द्वैताला पांघरुण मायेने शब्द छडी द्यावीच लागते व लागत असते.
अरे सद्भक्ता माझे आईचे कार्य बापापेक्षा नाजूक असुन हे सर्व स्त्रियांना भातुकलीने कळतेच,त्यामुळे मी अंतकरणात तळमळतेत्याची जाणीव मात्र कुणाला होत नाही कारण भातुकली हा फार मोठा खेळ आनंदाचा आहे.यात आपले सर्वस्वी विकुन एकरुप भानाने हे प्राणी रणांगणात सज्ज असतात.रात्रंदिवस आपले चित्त मन प्राण पणाला कष्टाने लावतात.हे कर्तव्यच होते का सांग बरे पाहु,अरे हे कर्तव्य कर्तव्यासाठीच गरजे पुरते होत नाही.तर हे सर्वस्व हित विकायला सुख दुःखाची खंत न बाळगता बेभान होणे बरे नाही व नसते व होणे चांगले नाही.जन्म मानवाचा झाला त्याला त्याला वृद्धपण तरुणपण व बालपण त्रिकाल योग संयोग हा त्रिकालानेच झाला.याचा उपयोग कसा करावा व करायचा हे गुरुनी आपल्या कुलदर्शिनी योगातुन कुल योग ज्ञानाने वापरून सांगितला.कारण आपण मानव जसे म्हणतो आमचे कुळ असे नाही तसे आहे.तसेच हे सद्गुरु कुलही ज्ञानाने उत्तम वस्तू रुपाशी निगडित असुन ते वेगळे नाही व नसते व आजही नाही.गुरु ईश्वरचं आहे.ते ईश्वरी कुलस्वामिनी निगडित आहे.कुलस्वामिनीला आपले कुलत्व का नाही आवडणार कारण तिच गुरुत्व शक्ती आहे.म्हणजे गुरु आणि ती दोन आहे का गुरु आत्मा रुपाने निगडित नाही का.आत्मा हा ईश्वर आहे.मग शक्ती आत्मा एकच आहे.याचेच कुलत्व प्रकाशी असुन ते कुळांशी आशीर्वाद देतात.परंतु हे कुळ कुळाचार हा धर्म संस्थापक नाही. परंतु हे क्षणिक पातळीचे गणित अध्यात्मात म्हणतात.कारण माया मायेने संयोग करुन या जडजिवांना साधे सामान पातळीने हळु हळु वळण द्यावे लागते,म्हणजे भक्ती भातुकलीतून ज्ञान मार्गात ज्ञान योगाने येते.कालमान धावत्या दृष्ट्या बदलाने बदल हा आर्थिक दृष्ट्या चांगला होणार आहे.परंतु त्यात लोभाने मानव फार त्यात गुंतला जातो व भक्तीला आंतरतो आहे याची नोंद घ्यावी.
अरे सद्भक्ता जागतिक दृष्ट्या फ़ैलाऊंन राजकारण डळमळनार परंतु,यात हस्तक्षेप करणारी कलावृत्ती जागी होणार. नैसर्गिक कालचिन्ह मला उष्णदेशी वाटतात.परंतु त्यात वायुने साद पडेल बरे असो अंधश्रद्धा सोडा.मला आंधळे होण्याची वेळ आणु नका.कारण मला अंधत्व करणारा भक्तच असतो व डोळे आणनाराही भक्तच असतो.मी याहून वेगळीच आहे परंतु मला तुमच्या ठिकाणी आंधत्व भोगण्यास येते.मला नेत्र आहे ते तिन म्हणुन मी वेगळी आहे.दोन आंधळे झाले कि तिसरा उघडुन हळुवार पाहुन मला गदा कळते की मी आंधळी कशाने झाली कारण त्यावर काजळी आली,कचरा पडला धूळ साचली.हि ह्या धावत्या वादळाला साद घालुन त्यात साधक आडकले.हे मला सर्वांच्या ठिकाणी माझ्या मी पणाने जागी होऊन पहाते,कारण आपणाला स्वप्नाने घेरले हे मला माहित आहे,व मी मात्र तुमच्या भुतामध्ये वेताळा सारखी या स्मशान धारी संसारात राखण आहे.याची कुणालाही जरुरी नाही.कारण नवे नवे स्वप्न भातुकलीच्या खेळात बरे आनंदाने वाटतात.भातुकलीत वेळच्या वेळी खेळुन योग्य त्या वेळी योग्यच काम करावे.परंतु तरुणपणी संसार,बालपणी बालवृत्ती बालपण परंतु वृद्धपणी तारुण्याचा व्यवसाय हा धरुन अंतकाळी ससे होलपट करू नका.वेळच्या वेळी कालमान जाणुन परमार्थाला जागवा,कारण परमार्थ हा कधिही चालतो.तर तो तरुणपणात मध्यमात वृद्धपणात सर्वस्व चालतो.परंतु आता वृद्धपणी वेळ नाही,त्यामुळे मी इतक्या दुरवरुन गाडी पकडुन आले त्याचे भाडे येथे राहिलेल्या दिवसाचे एकतरी फिटेल असे नाही वाटत,बेजावबदारी परमार्थात टाळा.आपल्यासाठीच सर्व आहे याची नोंद घ्या.फुकट दिवस वाढवुन ऋण भक्तीचे होत नाही.कारण फुकट दिवस वाढवणे आयुष्य खर्ची घालणे म्हणजे परमार्थ टाळणे असे आहे.चुकल्यास क्षमस्व बरोबर ते देवाचे चुकले ते माझे निमित्याला धरलेले.
आपली दास दगाबाई
माताजी वाढदिवस संदेश संपुर्णम
गुरु देव दत्तात्रय अर्पणमस्तु
