वंश परिचय

।।ओम ब्रह्मस्वरूपिणी कलंकी बेबीनाथ माया अल्पचरित्र ।।
। माया ब्र्हमचिया बारे अवतार। दत्त हा साचार जाणा बने।
। कोल्हाटी ते माया येत नाही ।तयाची पाहे काळूनिया।
। अवतार याचे सांगून दर्शन। येतसे घडून सुकृताने ।
। वैजनाथ म्हणजे युगायुगी राहे।येणे जाणा पाहे तयासाठी ।
( वंश परिचय )
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एक खेडे गाव कडलक आडनावाची बरीचशी घर या गावी असल्यामुळे त्याचं नाव पडलं आहे. जवळे कडलग सह्याद्रीच्या कुशीतील हे एक दुमदार खेडे चहूबाजूंनी डोंगरांनी व दर्याखोर्यांनी वेढलेले .आढळा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे खेडेगाव ,तसे हिरवळीने बाराही मास भरलेलं दिसत असे. पाण्याची मुबलकता यामुळे ऊस आणि द्राक्षे यासाठी एक प्रसिद्ध ठिकाण ,त्यामुळे अनेक मजूर लोक आपला पोटापाण्याचा व्यवसाय करण्यासाठी या गावी येऊन राहात.गावातील मुख्य व्यवसाय शेती असल्याने शेतीला उपयोगी पडण्यासाठी अनेक करू-नारू या गावी वस्ती करून होते. त्यापैकी शेतीसाठी लागणारी अवजारे व घरबांधणीचे लाकडीकाम करणारे कै. विठोबा कदम हे एक सद्गृहस्थ याचा पिढीजात सुतारकीचा व्यवसाय होता . विश्वकरमा हे त्यांचं कुलदैवत परंतु त्यांच्या घराण्यात शिवभक्तीच विशेष वेढ त्यांच्या धर्मपारायणे मुळे विठोबा सर्वांना प्रिय वाटत असे. लाकडी अवजारे बनवताना रामायण महाभारतातील गोष्टी सांगत विठोबा अनेक शेतकऱ्यांना तासन्तास खिळवून ठेवत असे. भोळसर स्वभाव मूळ विठोबाची परिथिती जेमतेम अशी होती.विटोबाला दोन तीन मुली झाल्या पण एकही जगली नाही.फक्त एकूलता एक मुलगा होता. हाच काय कुळाचा वारस वाचलेला सदाशिव हा आपला वडिलो परजित व्यवसाय करत असत. सदाशिव नवा प्रमाणे शीव भक्त होता तो शिवलेलामृत ग्रंथाचे पारायण करत असत. तसेच अनेक जवळ पास च्या तीर्थयात्रा करणे, कीर्तन,प्रवचन,भजन ऐकणे त्याला आवडत असे.त्याचा पत्नीचे नाव लक्ष्यमीबाई नवा प्रमाणे त्या लक्ष्यमी भक्त होत्या .त्यांची देवी ची उपासना नित्य असल्यामुळे त्यांना अनेकदा देवीचे दृष्टांत होत असत लक्ष्मीबाईंना तीन अपत्ये झाली. त्यांची नावे त्रंबक,चंद्रभान व निवृत्ती अशी होते. त्यापैकी श्री चंद्रभान यांचा जन्म एप्रिल १९२४ सली झाला तेच या कलंकिनी बेबी नाथ आदिशक्ती अवताराचे पतीश्री होत.त्यांचे शिक्षण जेमतेम दुसऱ्या इथे पर्यंत झाले. तरीसुद्धा त्यांच्या अंगी बऱ्याच कला उपजत आहेत .भजनीकाम दगडाच्या मूर्ती बनविणे पोथीपुराण ग्रंथवाचन करणे,पेटीमास्तर इतर कलागुणांनी ते संपन्न आहेत. त्यांचा पहिला विवाह भागीरथी ह्या साध्वी स्त्री बरोबर झाला. सन १९४२ साली तिला एक मुलगा झाला त्याचे नाव दत्तात्रय ठेवले. परंतु लवकर सन १९५० त्यांनी आपली इहलोकाची यात्रा संपवली.तदनंतर त्यांनी एक दीड वर्षांनी म्हणजे सन १९५१- ५२ साली श्री चंद्रभान यांचे नाशिक भागातील एक मुलीशी दुसरा विवाह झाला तिचे नावही भागीरीती हेच ठेवले गेले.त्यावेळी श्री चंद्रभान यांचे नाशिक भागातच बारा वर्ष वास्तव्य होते.पैकी तीन वर्ष चांदवड दोन वर्ष भगूर येथे राहणे झाले. भागीरथी बाईंना लग्नानंतर एक-दीड वर्ष सारखे देवीचे दृष्टांत होत असत .सफेद पातळ घातलेली व कुमकुम तिलक लावलेली दिव्यस्त्री येऊन मला तुझ्या घरी यायचं आहे.अशी सांगत असे असेच एके दिवशी दुपारी दीड दोनच्या सुमारास त्या घरात एकटया असताना एक तेजस्वी पुरुष त्यांच्या पुढे येऊन उभा राहिला.तो फक्त त्यांना दिसत होता आरडाओरडा करू लागल्या सुमारे अर्धा तास तो तेजस्वी पुरुष त्यांच्याशी संभाषण करून आदिशक्तीच्या जन्माची पूर्वसूचना देऊन. नंतर तो अदृश्य झाला तसेच श्री चंद्रभान मिस्त्री यांनाही मारुतीचा दृष्टांत होऊन आदिशक्तीच्या जन्माची कल्पना दिली गेली होती.