श्री
संत
कलंकिनी
बेबीनाथ
माया
श्री क्षेत्र वडगाव लांडगा, संगमनेर, जि. अहमदनगर (महाराष्ट्र)
आम्हाला कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, हया भूतलावर कलंकी दहावा अवतार ईश्वर वैजनाथ ३ १ जुलै १९१६ साली प्रगटले व ७ जुलै १९८७ साली महसमाधीस्थ झाले. ब्रह्ममाया अवतार युगायुगी ह्या भुतलावर प्रगट झालेले आहेतच. जसे श्री रामप्रभु समवेत सीतामाई, श्री कृष्णाबरोबर रूक्मिणी व ज्ञानेश्वरांबरोबर आदिशक्ती मुक्ताई आली होती. त्यावेळी मुक्ताईची धर्मकार्य करून जनजागृती करण्याची तीव्र इच्छा होती. परतू गुरूआज्ञेनुसार त्यांनी लवकरच अवतार संपविला। त्यावेळी त्यांना श्रीगुरूनी सांगितले होते की, तुझ्या हातून कलंकी अवतारात महान कार्य होईल. शिवशक्ती ब्रह्ममाया अशा एकरूप अर्धनारी नटेश्वर स्वरूपाला कोण बरे जाणत नाही? सर्व जगाचे कारण तर तेच होत. निर्गुण निराकार परमात्मा स्वरूपाचे प्रकट रूप म्हणजेच ब्रम्ह आणि माया है द्वैत भासून अद्वैत आहेत. म्हणूनच “यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत” हया परमेश्वराच्या दशावतार कार्यात मायेचे कार्य महान आहेच. नाथ सिध्द जालंदरनाथ यांचवेळी योगिनी रूपाने रूपवती नावाची शिष्या होती. नाथांना तीने संसार कसा असतो? असा प्रश्न केला होता तेव्हा नाथ सिध्द जालिंदरनाथ म्हणाले कलंकी दहाव्या अवताराच्या वेळी तुला त्याचा अनुभव येईल. त्यानुसार ह्या बेबीनाथ माया अवतारी संसाराचे चटके अनुभवत जगाला ज्ञानरूप अमृत पाजत आहेत.
तद्नुसार ह्या घोर कलियुगात सन १९५३ साली हया भूमंडलावर ब्रह्मस्वरूपिणी संत कलंकिनी बेबीनाथ माया प्रगट झाल्या. एका खेड्यात राहून केवळ फक्त नाममात्र चौथ्या इयत्तेपर्यंत शिक्षण. त्यात घरी अठराविश्वे दारिद्र्य. लग्नानंतर सतत व्याधीग्रस्त जीवन व अज्ञानी लोकांत वावर. इतक्या प्रतिकुल परिस्थीतीत राहून अध्यात्मिक कुंडलिनी शक्तीची प्रत्यक्षानुभूती घेवून ते संत भक्त तयार करण्याचे काम करत आहेत. गृहास्थमाचा स्वानुभव घेऊन सर्वसामान्य जीवन जगून भक्तजनांच्या उध्दारासाठी स्वयं हस्तलिखित ३०-३२ ग्रंथ, अभंग, पदे इ. वाड्मय त्यांच्या प्रासादिक वाणीतून बाहेर पडले. श्री. कलंकी देवांच्या महानिर्वाण नंतरच्या त्यांच्या कार्याची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. त्यांचे मुख्य कार्य आसुरी वृत्ती निर्दाळन व संतभक्त तयार करणे हे होय. संत कलंकिनी बेबीमाया यांच्या ‘सत्यज्ञान बोध ग्रंथ’ आणि ‘कलंकिनी माता पाच गुरुवार व्रत’ तसेच नवरत्न पाठ इ. त्यांचे पुस्तके भक्तानी अगोदरच प्रकाशीत केलेल्या आहेत. त्यामुळे वाचकांना त्यांच्या अध्यात्मिक शक्तीची प्रत्यता आली आहे.
तसेच संत कलंकिनी बेबीनाथ माया या आपल्या भक्तांबरोबर तीर्थक्षेत्री जावून तेथे आपले कार्य चालू ठेवतात. मागच्या काळात महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रे तसेच राज्याबाहेरील माऊंट अबु, वैष्णव देवी, मथुरा, काशी, वृंदावन इ. महत्त्वाच्या उत्तर भारतात आपली भक्तांबरोबर तीर्थयात्रा करून तेथिल भक्ताना उध्दारण्याचे काम केले. पुढील काळात त्यांचा अमृतसर व बालाजी येथे तीर्थयात्रा करण्याचा मानस आहे.
श्री. क्षेत्र वडगाव लांडगा, संगमनेर येथील आश्रमात मुंबई, पुणे, नाशिक, कल्याण, ठाणे, मालवण, बीड, पाथर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, जळगाव, पाचोरा, वाई, सातारा इ. भागातून भक्त येतात व संत कलंकिनी बेबीनाथ माया यांच्या ज्ञानभंडाराचा लाभ घेतात. भक्तांनी वर्गणी करून कलंकी देव मंदिर, ध्यानमंदिर, दत्तमंदिर, भक्तांना राहण्यासाठी मोठा हॉल बांधण्यात आला आहे. भक्तांची गैरसोय लक्षात घेता लवकरच नवीन बांधकामास सुरूवात करण्यात येणार आहे.
श्री. दत्त कलंकिनी अध्यात्म मिशन, वडगाव लांडगा.
-: आश्रमात साजरे केले जाणारे विविध कार्यकाण :-
श्री. कलंकी देव संस्थान व श्री. दत्त कलंकिनी अध्यात्म मिशन या दोन्ही संस्थेमध्ये देवांचे/ देवींवे उत्सव साजरे केले जातात. पुण्यतिथी, जयंती साजरी केली जाते. तसेच कलंकी देतांच्या जयंती निमित्त सर्व भक्तगण पायी दिंडी श्री. क्षेत्र वडगाव लांडगा ते मंगळापूर, चिखली, संगमनेर मार्गे कलंकी देव मंदिरात चालत जातात. तेथे पुढील कार्यक्रम पार पडतात. त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमा, कोजागिरी पोर्णिमा, दसरा, हनुमान जयंती, श्री राम जन्मोत्सव, दत्तजयंती, गोकुळाष्टमी, नवरात्र, गुडीपाडवा इ. कार्यक्रम मंदिरामध्ये साजरे केले जातात. तरी इतर सर्व भक्तांनी वरील कार्यक्रमास उपस्थित राहून सतसंगाचा लाभ घ्यावा.
सदरच्या दोन्ही तीर्थक्षेत्रास भेट देऊन तेथील ज्ञानभंडाराचा लाभ घ्यावा व श्री कलंकी देवांनी स्थापन केलेल्या विश्वधर्माच्या कार्यात आपला सहभाग घ्यावा व भारत भक्ती संप्रदयाची पताका कायम उंचवत ठेवावी.
