
संगमनेर येथे श्री कलंकी देव आश्रम, नगर रोड, ज्ञानमाता विद्यालयाजवळ सन १९६९ साली बांधला गेला. आता याच ठिकाणी कलंकी देवांचे समाधी मंदिर आहे व कलंकी देवांच्या जन्मशताब्दी निमित्त सर्व भक्तांनी देवांची जयपूर येथून मोठी मुर्ती तयार करून तिची प्राणप्रतिष्ठा दि. २२ एप्रिल २०१६ रोजी करण्यात आली. तसेच सभामंडप व ध्यान मंदिर येथे आहे. अहमदनगर येथे धर्मदाय आयुक्त यांच्या कार्यालयात श्री कलंकी देव संस्थान, संगमनेर रजि. नं.ई. ८६१ संस्था रजिस्टर करण्यात आलेली आहे. मंदिरात ५-६ मोठे उत्सव वर्षभरात साजरे होत असतात. श्रावण शु।।१ ला वडगांव लांडगा श्री. संत बेबीनाथ माया आश्रम येथून पायी दिंडी श्री. कलंकी देवांच्या जयंतीस निघत असते. वडगांव लांडगा येथे श्री संत बेबीनाथ माया यांचा आश्रम, दत्त मंदिर व ध्यान मंदिर आहे. त्यांनी कलंकी देवांचे कार्य पुढे चालू ठेवले आहे. माताजींनी हस्तलिखीतातून अनेक अध्यात्मिक ग्रंथांची निर्मीती केली आहे व अभंगवाणी आजही चालू आहे.
श्री. कलंकी देव संस्थान – विश्वस्त व्यवस्थेचे हेतु
१) प. पु. कलंकी वैजनाथ भगवान यांच्या हस्तलिखीत वाडःमयाची जपवणूक, संरक्षण, प्रकाशन, प्रचार, भाषांतरे इ. प्रसीध्द करणे.
२) जनजागृती, आत्मजागृतीसाठी श्री. कलंकी देवांच्या शिकवणीनुसार सामाजिक नैतिक मुल्यांची जोपासना करणे.
३) प. पु. कलंकी देवांच्या समाधीचे मंदिर बांधणे, मुर्तीची स्थापना करणे, धर्मशाळा, विश्रामगृह, सभामंडप बांधणे व व्यवस्था पहाणे.
४) सामुदायीक विवाह पध्दतीसाठी जनजागृती करणे, आयोजन करणे, हुंडा पद्धती दूर करण्यासाठी प्रचार व प्रसार करणे, कमी खर्चाच्या विवाह पध्दतीचा अवलंब करण्यास जनतेला प्रवृत्त करणे, त्यांना वैवाहीक जीवनाच्या जबाबदारीची जाणिव देणे, मर्यादित सुखी कुटुंब पध्दतीचे महत्त्व पटविणे त्यासाठी शिबीर सभा आयोजित करणे.
५) वृध्दाश्रम, अनाथाश्रम, बालसंस्कार केद्र, धर्मदाय दवाखाने, निसर्ग उपचार केद्र योग शिक्षण केंद्र, ध्यानधारणा केद्र, शारीरीक व्यायाम केद्र, सकस आहार केद्र इ. चालविणे अगर त्यांना यथाशक्ती सहाय्य करणे.
६) श्री. कलंकी देवाश्रमात कलंकी देव जयंती, पुण्यतीथी अनुग्रह दिन दत्तजयंती गुढीपाडवा व इतर नियमित होणारे कार्यक्रम साजरे करणे, गरीबांसाठी अन्नदान, महाप्रसाद आयोजित करणे. किर्तन, प्रवचने, पारायणे सप्ताह याचे आयोजन करणे.
७) मुलांचा (विद्यार्थ्यांचा) बौद्धिक कल बांधून त्यांना शालेय मार्गदर्शन करणे, शिष्यवृत्ती देणे, शाळा, कॉलेज व शैक्षणिक संस्था चालविणे.
८) जगातील नानाविध धर्माचा, मतप्रणालीचा, रुढी परंपरांचा शास्त्रोक्त पध्दतीने अभ्यास करुन त्यातील सारतत्व व कलंकी देवांच्या शिकवणूकीची सांगड घालून त्याचा अखिल विश्वात प्रसार व प्रचार करणे.
९) जगातील सर्व मानवजात ही एकच वैदिक प्रेरणेतून निर्माण झाली असून सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहेत या विज्ञान मान्य तत्त्वाचा प्रसार करुन सद्य प्रचलीत जन्मावरुन पडलेल्या जातीभेद, पंथ भेद इ. विषयी लोकांना ज्ञान देऊन जनजागृती घडवून आणणे व विश्व बंधुत्व भावनेची जोपासना करणे.
१०) प. पु. कलंकी भगवान यांचा जेथे जेथे वास झाला असेल तेथे तेथे त्यांची मंदिरे, स्मारक उभारणे, त्याची व्यवस्था पहाणे. त्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करणे त्यांच्या मातापीत्यांची समाधीची व्यवस्था व देखभाल करणे.
११) वरील सर्व उद्देश पुर्तीसाठी आवश्यक त्या स्वरुपाची कार्यवाही करणे.
