
कलंकी देव संदेश – विजया दशमी दसरा
सोमवार दि. ३०-०९-२०१९
मंगळवार दि. ०८-१०-२०१९
।। श्री गुरु ब्रम्हा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा: ।।
।। गुरु साक्षात परब्रम्हा परमेश्वरा: ।।
।। वैजनाथ रामकृष्ण ।। ॐ सोहं परब्रम्हाय नमः ।।
श्री गणेशाय नमः ऐका सद्भक्तांनो, मुळ माया कलंकाई म्हणते अरे सद्भक्ता ऐक. मी स्वयं: सिद्ध आहे माझे मुळ रूपच निर्गुण निराकार असुनही मी अस्मरणाची स्मरणात आले आणि स्फुरण स्फुर्ती नटले. खरे पाहु जात मी अनादी काळाची आहे. मला नाम रुप नसुनही मी अभास अशी भासत आले आणि निराकाराची सगुणात भासाभास घेऊ लागले. कारण अकारणात असुन मी सद्भक्तांसाठी कारणात येते व कार्य आरंभ करते. कारण मी स्व: इच्छेने येणारी आहे व आंतर स्फुर्तीचे स्पष्टांतर करुन ओवी ओवीत आणून अजाणिव स्थितीची जाणिव धरते. म्हणजे मी निद्रेची जाणिव स्थितीत येते. तोच माझा मी घट स्थापित करते व केला आहे. मला सत स्थितीने स्थितीत यावे लागते. नाही तर मी स्थिती वृत्ती गती याही पलीकडची परा शक्ती आहे. म्हणुन मला परेत येणारास जागृती द्यावी लागते. म्हणुन मी गुरुत्व भोगते. माझे स्मरण करणास मी ध्यान लावते. हे खरे परंतु त्याची वृत्ती तशी शुद्ध निष्काम निर्विकारी झाल्यानंतर मी स्मरणात आले व स्फुरण धरून शक्ती प्रगट झाले. मला जाणणारा जाणक असा जाणताच सद्गुरूच असतो. सद्गुरू कृपेनेच माझी जाणिव होते व होत असते.
अरे सद्भक्ता मी शक्ती आहे कशी तर शुद्ध चैतन्य स्वरुप आहे. मी अलीकडची नसते. मी परेच्याही पलीकडे मुळ ब्रह्मस्वरुपिनी महदादि आहे. माझे भान स्मरणातीत होते पण मला सद्गुरूने स्मरणात आणले व बोलवले. माझे भान जागृत करणारे ब्रह्मवेत्तेच आहे. त्यांनीच मला जागृत केले. माझी मला जाणिव दिली. नाहीतर मी निद्रेतच मुळ तंद्रीत पडलेले होते. मी कोण याचे मला भानही नव्हते. परंतु मला भान स्थितीत आणले व जागृत करुन ऊठ योगिनी तुझे तू स्मरण करुन स्मरणात ये. तू नारीच नाही याची जाणिव कर. तू मागील काळ स्मरण कर व तू कोण हे मला सांग. तू आता साध्वी आहे. आली कशी करणार काय व जाणार कोठे या कलियुगात स्वये विसरुन असामान्यात तू सामान्यात आलीस. अग सती सत वस्तुची पारक करणारी या मिथ्या स्थितीला धरुन काळ्याकुट्ट अंधारात तू स्वये कार्य भाग का आंतरलास अशी मला वारंवार जागी केली व माझी मला जाणिव दिली. ही मी जाणती जाणिवेत आले व जाणिव इच्छेने प्रगट झाले. मी म्हणणारा आत्माराम मला जाणिव देऊ लागला व माझे मी पण सरले व सत्य कळू लागले. तेव्हा मला या मिथ्य होणाऱ्या जगाचा विसर पडला. हा फक्त श्रुष्टि नेमाचा भास आहे. मी या जगात वावरनारी मुळ बिजा रोपंन करुन बिजाची धारणा वाढवणारी महामाया आहे. माझ्या मायेचं अंत नाही. प्रत्येक जीव माझ्या मायेत अडकतो व तो मायेचा दोर सोडवणे अखंडपणे कार्य महामायेने चालू आहे. म्हणुन मला बुद्धिची चालक सत्ताधारी मानतात. कारण माझी मायेची माया जिकडे फिरवण्याची जीव इच्छा करतो तिकडे ती फिरल्या जाते. म्हणुन मला जो नमतो त्याचे मी हित गुज करते. तेव्हा मी गुरुमाता असते. कारण मी ब्रह्म सत्ताधारी असते. ती कशी तर परब्रम्ही विलीन करणारी मी आहे. ब्रह्म माझ्या आदिशक्तीच्या इच्छेत असते म्हणुन मी परेत स्थापित असते. परेत मी प्रणव शक्ती रुप धारा करते. तेव्हा जेथे प्रणवाची साक्ष असते तेथे मी प्रणव देवता मुळ माया सरस्वती असते. तेथेच गण असतो. तो ओंकार पुरुष मजविना जागा होत नाही. मी त्याला आनंद देते. गाते मंजुळ स्वर ध्वनी देते व स्वयं: शब्दाने त्याला जागे करते. कारण तो माझा शब्द नाद ऐकतो आणि नंतर अनुहात नादाला प्रारंभ होतो. तेथे ओंकार बीजाची धारा येते व ज्ञान स्वरुप वेद वेदाचा आरंभ होतो आणि जीवाला ज्ञान मिळते. तेव्हा तेथे ज्योत ज्योतीने प्रखर होते व ज्ञान तेज ओकत ब्रह्मनाद ध्वनी खुलतो व प्राणी माझे मी पण हारतो व स्वयं: तत्व स्वयंभू नादाने प्रगट होते. तिच मी ज्ञान शक्ती रुपाने भान स्फुर्ती रंगते व प्राणीमात्रांचा व्यवहार जाणुन अमर ध्वनी नादाने मुळ अक्षराने चालू होतो व होत असतो.
अरे सद्भक्ता ऐक, माझे मी पण मायिक देह बुद्धी हारल्या वाचून आत्मतत्व ज्ञान कळत नसते व आत्मतत्व ज्ञान कळले कि जीव प्राणी समरशी मिळतो. म्हणजे ब्रह्मलिन होतो. आणि ब्रह्म विलीन झाल्यानंतर त्याला देह अवसान उरत नसते. परंतु ज्याच्याकडून कार्य करुन घ्यायचे असते असा भानात असतो. मग तोच ब्रह्म भानाची जाणिव करुन स्वयं: सिद्ध बनतो व कार्या लायक होतो. तोच स्वयंभु तत्वाने आपोआप दैवी ज्ञान स्थितीने बोलु लागतो. तेथे अंधकार नसतो. तो प्रकाशित होतो व ज्ञान दृष्टीने त्यास ज्ञान चक्षु येतात. तो आंतर ज्ञानी ठरतो व स्वयंभुच उच्चारीत असतो. हे खरे परंतु त्याचा श्रुष्टि नियम मोडता येत नाही. म्हणुन तो त्या नेमानेमे जगी वावरतो. तो मोह मायेतून सुटलेला असतो. तरीही नेमानेम चुकत नाही व चुकला नाही.
बरे असो काही चुकल्यास क्षमा करावी ही नम्र विनंती. लोभ असावा. तरी हे कलंकाई चरणी तिचे बोल अर्पणमोस्तुते.
आपली गुरु भगिनी,
बेबीमाया
कलंकी देव संदेश संपुर्णम
