भारत ही साधु, संत, महंत, साध्वी आदि विभूतींची पवित्र भूमी आहे. यात अनेक रत्ने जन्माला आली. तद्वत ह्या महाराष्ट्र भूमित नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे श्री कलंकी वैजनाथ देवांचा जन्म श्रावण शु।। १। सन १९१६ साली झाला. श्री कलंकी देवांचे वडील श्री. सखाराम वर्धेकर भोसले हे श्री अत्रिऋषि व मातोश्री अवा ह्या अनुसूया महासती होत्या असे श्री कलंकी देव सांगत. त्यांचे चुलता-चुलती ही मागील जन्मी सावता माळी व संत जनाबाईच्या भूमिकेत होत्या. श्री कलंकी देवांचे बालपण नाशिक, पंचवटी येथे गेले. अक्षर ओळख इतकेच इयत्ता ४ थी पर्यंत शिक्षण झाले, कलंकी देव सन १९३५ साली नाशिक पंचवटीतील काळ्या रामाच्या देवळाला प्रदक्षिणा घालीत असतांना शिडीचे साईबाबा तेथे अकस्मात आले व देवांना भेट दिली. श्री दत्त भगवतांनी कलेकी देवांना पुण्यास प्रयाण करावे असा निरोप दिला. तदनुसार ते पुणे येथे लगेचच गाडीखाना भागात राहवयास गेले. तेथे दत्त प्रभु अकस्मात आले व २१ दिवस श्री कलंकी देवां सोबत राहून त्यांना सन १९३६ च्या विजयादशमीस अनुग्रह दिला व तुझ्या सिध्द हस्त लेखणीतून सहा शास्त्र, चारवेद यांचे सार ज्ञानरुपाने प्रगट होईल, विश्वधर्माची स्थापना होईल व चिरंजीव हो म्हणून आशीर्वाद दिला व महाराष्ट्रभर पदयात्रा करण्यास सांगितले. ।
तदनुसार श्री कलंकी वैजनाथ देवांनी संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण केले. त्यात पंढरपूर, गाणगापूर, तुळजापूर, अक्कलकोट, कोल्हापूर, मांढरदेवी, वाई, सातारा, सञ्जनगड इत्यादी ठिकाणे मुख्य होत. वाई, सातारा येथे त्यांचा बराच काळ रहिवास होता. येथे असतांना मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, रेवणनाथ इत्यादी नाथांच्या भेटी झाल्या. काही ठिकाणी कलंकी देवांचा छळ झाला. ७-८ वेळा विषप्रयोग झाल्याचेही श्री कलंकी देव सांगत असे. त्या काळात अनेक भक्तांना त्यांचे चमत्कार, साक्षात्कार घडले वाई येथे असतांना देवांच्या मातोश्रीचे देहावासन झाले. १० दिवस पुर्ण होत नाही तोच देवांच्या वडीलांचेही देहावासन झाले होते. त्यावेळी सर्व भक्तांच्या विनवणीवरून देवांनी त्यांच्या वडीलांना पुन्हा जिवंत करून त्यांचे देहावासन १५ दिवसांनी लांबविले होते. तेथून पुढे कलंकी देवांची भावसमाधी लागत असे व दत्तात्रय म्हणे अशी अभगवाणी निघत असे. सन १९५० साली ते पुन्हा संगमनेर भागात आले. तेथील जवळच वडगांव लांडगा, पिंपळगांव निपाणी, राजापूर मळा, वेल्हाळे, बाळेश्वर पोखरी, समनापुर मळा इत्यादी भागात रहीवास झाला. येथेच त्यांनी आत्मबोधामृत, स्वानंदलहरी, गुरुमार्गदर्शन गीता, प्रेमरहस्य, तरंग, परमस्थिती गीता आदि ग्रथांची निर्मिती केली. लाखो अभंगावली पदे, दोहरे आदि वाङ्मयांची रचना केली. वडगांव लांडगे येथे असतांनाच विश्वधर्माची स्थापना केली व ज्ञानेश्वर माऊलीच आगवत धर्माचे कार्य पुढे चालू ठेवले. अनेक प्रकारच्या अंधश्रध्दा खुब्यारुढींचे निराकरण केले. स्त्री-पुरुष ह्या मानवाच्या मुख्य दोन जाती असून इतर सर्व मानव निर्मित होय. आचार शुध्द बनण्याचा मार्ग हाच खरा मानवता धर्म होय ही शिकवण त्यांनी भक्तांना दिली व अनुग्रह देऊन अध्यात्मिक उपदेश केला.
संगमनेर येथे श्री कलंकी देव आश्रम, नगर रोड, ज्ञानमाता विद्यालयाजवळ सन १९६९ साली बांधला गेला. तेव्हापासून तेथे त्यांचा रहिवास जुलै १९८७ साली महानिर्वाण होईपर्यंत होता. आता याच ठिकाणी त्यांचे समाधी मंदिर आहे व कलंकी देवांच्या जन्मशताब्दी निमित्त सर्व भक्तांनी देवांची जयपूर येथून मोठी मुर्ती तयार करून तिची प्राणप्रतिष्ठा दि. २२ एप्रिल २०१६ रोजी करण्यात आली. तसेच सभामंडप व ध्यान मंदिर येथे आहे. अहमदनगर येथे धर्मदाय आयुक्त यांच्या कार्यालयात श्री कलंकी देव संस्थान, संगमनेर रजि. नं.ई. ८६१ संस्था रजिस्टर करण्यात आलेली आहे. मंदिरात ५-६ मोठे उत्सव वर्षभरात साजरे होत असतात. श्रावण शु।।१ ला वडगांव लांडगा संत बेबीनाथ माया आश्रम येथून पायी दिंडी कलंकी देवांच्या जयंतीस निघत असते. वडगांव लांडगा येथे श्री संत बेबीनाथ माया यांचा आश्रम दत्त मंदिर व ध्यान मंदिर आहे. त्यांनी कलंकी देवांचे कार्य पुढे चालू ठेवले आहे. माताजींनी हस्तलिखीतातून अनेक अध्यात्मिक ग्रंथांची निर्मीती केली आहे व अभंगवाणी आजही चालू आहे.
अनेक भाविक भक्त कलंकी देव समाधी दर्शनाचा व ज्ञानाचा लाभ घेतात, सत बेबीनाथ माया यांच्या दर्शनाचा व ज्ञानामृताचा लाभ घेऊन कृतार्थ होतात, आपण ह्या महान विभूतींच्या कार्यास तन-मन-धन रूपे सहकार्य करून आपले जीवन कृतार्थ करून घ्यावे ही नम्र विनंती!

बातमी

श्री कलंकी देव जन्म शताब्दी महोत्सव २२ एप्रिल २०१६ रोजी संगमनेर येथे मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला.

पुढील कार्यक्रम

श्री गुरु पौर्णिमा
१६ जुलै २०१९
कलंकी देव आश्रम, वडगाव लांडगा