संस्थेबद्दल माहिती

संगमनेर येथे श्री कलंकी देव आश्रम, नगर रोड, ज्ञानमाता विद्यालयाजवळ सन १९६९ साली बांधला गेला. आता याच ठिकाणी कलंकी देवांचे समाधी मंदिर आहे व कलंकी देवांच्या जन्मशताब्दी निमित्त सर्व भक्तांनी देवांची जयपूर येथून मोठी मुर्ती तयार करून तिची प्राणप्रतिष्ठा दि. २२ एप्रिल २०१६ रोजी करण्यात आली. तसेच सभामंडप व ध्यान मंदिर येथे आहे. अहमदनगर येथे धर्मदाय आयुक्त यांच्या कार्यालयात श्री कलंकी देव संस्थान, संगमनेर रजि. नं.ई. ८६१ संस्था रजिस्टर करण्यात आलेली आहे. मंदिरात ५-६ मोठे उत्सव वर्षभरात साजरे होत असतात. श्रावण शु।।१ ला वडगांव लांडगा संत बेबीनाथ माया आश्रम येथून पायी दिंडी कलंकी देवांच्या जयंतीस निघत असते. वडगांव लांडगा येथे श्री संत बेबीनाथ माया यांचा आश्रम दत्त मंदिर व ध्यान मंदिर आहे. त्यांनी कलंकी देवांचे कार्य पुढे चालू ठेवले आहे. माताजींनी हस्तलिखीतातून अनेक अध्यात्मिक ग्रंथांची निर्मीती केली आहे व अभंगवाणी आजही चालू आहे.